सुशांतसिंह राजपूतचा मृत्यू झाल्यानंतर अनेकांना अनेक शक्यता या घटनेत दिसल्या. काहींना यात नेपोटिझममुळे त्याला आलेला ताण दिसला. काहींना आऊटसायडर्सना मिळणारी वागणूक दिसली. काहींना रिया चक्रवर्तीने आर्थिक फसवणूक केल्याचा संशयही आला. अमली पदार्थाचे संदर्भही आलेच. हे सगळं सुरू असताना इंडस्ट्रीतल्या हुशार मंडळींनी सुशांतच्या मृत्यूवर सिनेमा बनवायचा घाट घातला. सुशांत जाऊन दोन महिने होण्याआधीच सिनेमे जाहीर झाले. पण आता या सिनेमांची वाट जरा बिकट झाली आहे.
सुशांतवरून चाललेला राडा आणि त्यातलं नाट्य पाहून अनेकांना यात सिनेमा दिसला हे खरंच आहे. पण घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन चित्रपट जाहीर करण्याचं त्यांचं घाडस काही झालं नाही. पण त्यातही पहिला सिनेमा जाहीर झाला. सिनेमाचं नाव होतं सुसाईड ऑर मर्डर - द स्टार वॉज लॉस्ट. या चित्रपटात सुशांतसारखा दिसणारा कलाकार सचिन तिवारी याला घेण्यात आलं. सिनेमाची काही पोस्टर्सही आली. या पोस्टरमध्ये रिया चक्रवर्ती, मुकेश छाब्रिया इतकंच नव्हे, तर आदित्य ठाकरे, करण जोहर यांच्याशी साधर्म्य दाखवणारी व्यक्तिचित्र आली. सिनेमा कधी तयार होईल याबाबत वाच्यता नव्हती. पण हळूहळू या लोकांनी पोस्टर्स जाहीर करायला सुरुवात केली.
आत्महत्याच करावी असं वाटायचं; रियाची आई संध्या यांनी सौडलं मौन
हा प्रकार सुरू असतानाच आणखी एकाने सुशांतवरच्या चित्रपटाची घोषणा केली. त्याने पोस्टर काढलं नाही. एका वेबसीरीजची चर्चाही सुरू होती. सुशांत-रियावर वेबसीरीज करायची असं ठरू लागलं. या सगळ्यात त्याच्यावरचं पुस्तक बनण्याची शक्यता अगदीच दाट होती. आता या सर्वच शक्यता धूसर झाल्या आहेत. कारण, सुशांतवर आता काहीही अगदी काहीही बनवयाचं असेल तर त्याची आधी रीतसर परवानगी घ्यावी लागणार आहे. कारण राजपूत कुटुंबियांनी याचे सगळे हक्क आपल्याकडे घेतले आहेत. केवळ चित्रपटच नव्हे, तर पुस्तक, मालिका असं काहीही असेल तरी त्यांची परवानगी घ्यावी लागेल.
सुशांत प्रकरणाचा तपास आता अंतिम टप्प्यात आला आहे. सीबीआय, एम्स, इडी, एनसीबी आदी सर्वच घटकसंस्था आपआपले अहवाल तयार करु लागल्या आहेत. लवकरच त्यातलं सत्य समोर येईल. पण या निमित्ताने सुशांतवरच्या चित्रपटांना चाप बसला आहे हे नक्की.
Kangana Ranaut : कंगनाच्या अडचणीत वाढ, न्यायालयाकडून गुन्हा दाखल करण्याचे निर्देश