Sanjay Narvkar Recalls Memories From Vaastav Set : बॉलिवूड चित्रपटांपैकी क्लासिक कल्ट सिनेमा म्हणजे वास्तव. या चित्रपटाला अलिकडे 25 वर्ष पूर्ण झाली. 25 वर्षांनंतर ही या चित्रपटाची कथा आणि कलाकार यांना प्रेक्षकांकडून मिळणारं प्रेम तिळमात्रही कमी झालेलं नाही. या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर कायमची छाप पाडली. महेश मांजरेकर दिग्दर्शित वास्तव चित्रपटामुळे संजय दत्तला वेगळी ओळख मिळाली. या चित्रपटामुळे तो नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला आला. त्याच्या वास्तववादी अभिनयाचं खूप कौतुक झालं. या चित्रपटात अनेक मराठमोळ्या कलाकारांनीही काम केलं होतं. वास्तव चित्रपटामध्ये संजय नार्वेकर, रिमा लागू आणि शिवाजी साटम हे मराठी कलाकार देखील होती. संजय नार्वेकर यांनी चित्रपटाच्या शूटींगदरम्यानचा एक किस्सा सांगितला आहे.
संजय दत्तने मराठी अभिनेत्याला दिलेली 'अशी' वागणूक
अभिनेते संजय नार्वेकर आणि अभिनेता संजय दत्त यांना वास्तव चित्रपटामुळे वेगळी ओळख मिळाली. या चित्रपटानंतर त्यांचा बॉक्स ऑफिसवर दबदबा पाहायला मिळालं. या चित्रपटात मराठी अभिनेते संजय नार्वेकर यांनी 'देड फुट्या' ही भूमिका साकारली होती. संजय नार्वेकरांच्या अभिनयाला प्रेक्षकांनी खूप दाद दिली. संजय नार्वेकर आणि संजय दत्त या दोघांची जोडी प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली. आता संजय नार्वेकर यांनी संजय दत्तसोबत शुटींग करताना किस्सा सांगितलं आहे.
वास्तव चित्रपटाच्या सेटवरील 'तो' किस्सा वाचा
वास्तव या क्लासिक कल्ट चित्रपटाला 25 वर्ष झाली. या निमित्ताने अभिनेते संजय नार्वेकर यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. अभिनेता संजय दत्तसोबतचा शुटिंगचा पहिला दिवस कसा होता, हे त्यांनी सांगितलं. "यावेळी संजय नार्वेकर म्हणाले की, वास्तव चित्रपटाच्या सेटवर पहिल्याच दिवशी मी खूप घाबरलेलो होतो. मला आठवत मी घाबरलेलो होतो, नर्व्हस होतो कारण समोर सुपरस्टार संजय दत्त होता. माझ्या पहिल्या डायलॉगवेळी शॉट सुरु व्हायच्या आधी संजय माझ्या जवळ आला आणि म्हणाला, तू पण संजय मी पण संजय, घाबरू नकोस, जे काही होईल ते आपण मिळून बघून घेऊ. तो एका सुपरस्टारप्रमाणे नाही, तर एका जवळच्या मित्राप्रमाणे बोलला".
"मी ते कधीही विसरु शकत नाही"
शुटींगच्या पहिल्या दिवशी संजय दत्तने दिलेल्या वागणुकीबद्दल बोलताना संजय नार्वेकर म्हणाले की, "संजय दत्तच्या बोलण्यानंतर मला आत्मविश्वास मिळाला, माझी भीती निघून गेली. ती गोष्ट माझ्या लक्षात आहे, मी ते कधीही विसरु शकत नाही".
महत्त्वाच्या इतर बातम्या :