बंगळुरु : दुखापतग्रस्त विराट कोहलीची विचारपूस करण्यासाठी त्याची गर्लफ्रेण्ड आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा बंगळुरुमध्ये पोहोचली. उजव्या खांद्याच्या दुखापतीमुळे विराट आयपीएलच्या दहाव्या मोसमातील एकही सामना खेळू शकलेला नाही.

विराट आणि अनुष्काचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये अनुष्का आणि विराट दोघेही एकाच घरातून बाहेर पडताना दिसत आहेत.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात, क्षेत्ररक्षण करताना कोहलीच्या खांद्याला दुखापत झाली होती. त्यामुळे चौथ्या कसोटी सामन्यात तो खेळू शकलेला नव्हता.

उजव्या खांद्याच्या दुखापतीमुळे विराटच्या गैरहजेरीत रॉयल चॅलेन्जर्स बंगलोरचं नेतृत्त्व सध्या शेट वॉटसनकडे आहे. आयपीएलमध्ये आरसीबीचा संघ तीन सामने खेळला आहे, पण विराट कोहली अजूनही मैदानापासून दूर आहे.



सुदैवाने विराटच्या खांद्यात फ्रॅक्चर नाही, त्यामुळे डॉक्टरांनी त्याला विश्रांतीचा सल्ला दिला आहे. त्यामुळे विराट कोहली सध्या क्रिकेटपासून दूर आहे.