Anushka on Social Media : बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने सोशल मीडियावर एक गोंडस फोटो शेअर केला आहे. त्या फोटोत अनुष्काचा नवरा विराट कोहली आणि लेक वामिका दिसून येत आहे. या फोटोत विराट त्याच्या मुलीसोबत म्हणजेच वामिकासोबत खेळताना दिसून येत आहे. हा मजेशीर फोटो चाहत्यांचे चांगलेच लक्ष वेधून घेत आहे. विराट आणि वामिकाचे फोटो सोशल मीडियावर शेअर होताच व्हायरल होत असतात. अनुष्काने शेअर केलेल्या या फोटोला अर्ध्या तासात 9 लाख लाईक्स मिळाले आहेत. 


विराट आणि वामिकाच्या फोटोवर अनुष्काने केली खास कमेंट


विराट आणि वामिकाला एकत्र खेळताना पाहून अनुष्काला प्रचंड आनंद होत आहे. तिने तिच्या भावना शब्दात व्यक्त केल्या आहेत. 'माझं पूर्ण विश्व एका फ्रेममध्ये' अशी कॅप्शन  देत अनुष्काने फोटो शेअर केला आहे. विराट त्याच्या मुलीकडे बघत असताना चेहऱ्यावर हसू आहे. वामिकाच्या फोटोवर चाहते कमेंट्सचा पाऊस पाडत आहेत. 


बॉलिवूड कलाकारांचे फोटोवर कमेंट्स


आलिया भट्ट, वरुन धवन, जेनेलिया डिसूजा, जॅक्लीन फर्नांडिंजने वामिकाचा फोटो लाईक केला आहे. तर रकुल प्रीत सिंग आणि मसबा गुप्ताने कमेंट्स केली आहे. 


अनुष्का आणि विराट वामिकाचा पूर्ण चेहरा का दाखवत नाही?


लग्नाला तीन वर्ष झाल्यानंतर विराट आणि अनुष्काला वामिका झाली आहे. अनुष्का आणि विराट 2017 साली लग्नबंधनात अडकले होते. त्यानंतर 11 जानेवारी 2021 ला वामिकाचा जन्म झाला. विराट आणि अनुष्काला 'वामिकाचा पूर्ण फोटो का शेअर करत नाही' अशा अनेक कमेंट्स चाहते करत होते. त्या सर्व कमेंट्सना प्रतिउत्तर देत विराट म्हणाला,"वामिकाला सोशल मीडिया प्रकरण जेव्हा कळेल, त्यानंतर तिला वाटलं तर ती सोशल मीडियावर तिचे फोटो शेअर करेल".   


अनुष्का शर्माचे आगामी प्रोजेक्ट


इरफान खानचा मुलगा बाबिल खानच्या 'क्वाला' चित्रपटात अनुष्का दिसून येणार आहे. या चित्रपटाची निर्मिती शर्मा क्लीन स्लेट फिल्मस करणार आहे.


अनुष्का शर्माने केली नाराजी व्यक्त
बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि विराट कोहली सोशल मीडियावर आपल्या कठोर कमेंट्ससाठी ओळखले जातात. पुन्हा एकदा अनुष्का शर्माने पॅपाराजीच्या एका कृत्यावर नाराजी व्यक्त केली आहे. पती विराट कोहलीसोबत वेळ घालवत असताना अनुष्का आणि विराटचा फोटो पॅपाराजीने कॅमेऱ्यात कैद केला. त्यावरुन अनुष्काने फोटोग्राफरला खडे बोल सुनावले आहेत. दरम्यान, विराट आणि अनुष्का आपल्या घराच्या लॉबीमध्ये एकमेकांसोबत वेळ घालवत होते. अशातच फोटोग्राफरने त्यादोघांना स्पॉट करत एक फोटो क्लिक केला आणि तो सोशल मीडियावर शेअर केला. त्याच्या याच कृत्यावर अनुष्काने नाराजी व्यक्त 
केली आहे.