Anushka Sharma :  बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma)  सध्या चर्चेत आहे. अनुष्का आणि विराट कोहली (Virat Kohli) यांनी 20 फेब्रुवारी रोजी चाहत्यांना आनंदवार्ता देताना नवजात बाळाचे पालक झाले असल्याची बातमी दिली. विरुष्काने आपल्या नवजात मुलाचे नाव अकाया असे ठेवले आहे. आता दुसऱ्या मुलाच्या जन्मानंतर अनुष्का शर्मा अभिनय कारकीर्दीला राम राम करणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे. अनुष्काचा एक व्हिडीओ व्हायरल होत असून हा व्हिडीओ 11 वर्षांपूर्वीचा आहे. 


अनुष्का शर्माचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये ती लग्न आणि करिअरच्या प्राथमिकतेबाबत चर्चा करताना दिसत आहे. या दरम्यान तिने आपल्या वैवाहिक आयुष्यात मुलांचे किती महत्त्व आहे हे सांगितले. 


अनुष्का शर्माने सिमी ग्रेवालला दिलेल्या मुलाखतीत तिच्या आयुष्यात लग्नाचे महत्त्व सांगितले होते. तसेच, मुले जन्माला घालणे आणि करिअरमधून ब्रेक घेणे यावर मुलाखतीत भर देण्यात आला. तिच्यासाठी लग्न किती महत्त्वाचे आहे, असे तिला विचारले असता, अनुष्काने सांगितले की,'माझ्यासाठी हे खूप महत्त्वाचे आहे. मला लग्न करायचे आहे. मला मुलं हवी आहेत. माझे  लग्न झाले तर कदाचित मी काम करण्यास अनुच्छुक राहिल असेही अनुष्काने सांगितले. 






सात वर्षांपूर्वी झाला विराटसोबत विवाह 


2017 मध्ये इटलीतील लेक कोमो येथे अनुष्का आणि विराट विवाहबद्ध झाले होते. या विवाह सोहळ्यात फक्त कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. त्यांच्या या विवाहाच्या बातमी अनुष्का-विराटच्या चाहत्यांना सुखद धक्का बसला होता. 






लग्नानंतर निर्मितीमध्ये ठेवले पाऊल...


लग्नानंतर अनुष्काने चित्रपटांमध्ये काम करणे  कमी केले होते. वैयक्तिक आयुष्यावर तिने लक्ष केंद्रीत केले होते. त्याच दरम्यान तिने बुलबुल आणि पाताल लोक सारख्या प्रोजेक्टची निर्मिती केली. वामिकाच्या जन्मानंतर अनुष्का रुपेरी पडद्यापासून काहीशी दूर झाल्याचे चित्र होते. 


इतर संबंधित बातमी :