Virat Kohli Anushka Sharma : विराट कोहली (Virat Kohli) आणि अनुष्का शर्मा (Anushka Sharma) यांना पुत्ररत्न प्राप्त झाले आहे. सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत त्यांनी चाहत्यांना गोड बातमी दिली आहे. बाळाचं नाव त्यांनी 'अकाय' (Akaay) असं ठेवलं आहे. त्यामुळे 'अकाय'चा अर्थ काय हे जाणून घेण्याची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.


'अकाय'चा अर्थ काय? (Akaay Meaning)


विरुष्काने 'अकाय' हे नाव खूप विचार करुन ठेवलं आहे. हिंदी शब्दकोशानुसार, 'अकाय' म्हणजे 'निराकार'. कोणताही आकार, रूप नसलेल्याला निराकार म्हणटलं जातं. 'अकाय'चा एक अर्थ चंद्राचा प्रकाश असाही होतो. एकंदरीतच विरुष्काचं आयुष्य प्रकाशमय करणारा 'अकाय' आहे. 


वामिकाचा अर्थ काय? (Vamika Meaning)


विराट-अनुष्काने आपल्या पहिल्या लेकीचं नाव 'वामिका' असं ठेवलं आहे. वामिका हे नाव विराट आणि अनुष्का या दोन नावांचे एकत्रिकरण आहे. तसेच या नावाचा खास अर्थदेखील आहे. 'वामिका' या नावाचा संस्कृतमध्ये अर्थ होतो 'देवी दुर्गा'. 
 
'वामिका' या नावात विराट आणि अनुष्काच्या नावाचे अक्षर देखील आहे. वामिका या नावात पहिलं अक्षर 'व' आहे. हे तिच्या वडिलांच्या म्हणजे विराट कोहलीच्या नावावरून घेण्यात आलं. यानंतर 'वामिका' नावातील शेवटचं अक्षर 'क' म्हणजे 'का'. हे तिच्या आईच्या म्हणजे अनुष्का शर्माच्या नावावरून घेण्यात आलं आहे. 


विराट-अनुष्काने दिली गुडन्यूज (Virat Kohli Anushka Sharma Post)


विराट-अनुष्काने खास पोस्ट शेअर करत चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. त्यांनी लिहिलं आहे,"आम्हाला कळवण्यात अत्यंत आनंद होत आहे की,15 फेब्रुवारी 2024 रोजी आम्ही आमच्या दुसऱ्या बाळाचं अर्थात वामिकाचा लहान भाऊ 'अकाय'चं स्वागत केलं आहे. आमच्या आयुष्यातील या गोड क्षणादरम्यान आम्हाला तुमच्या शुभेच्छा हव्या आहेत. कृपया आमच्या गोपनीयतेचा आदर करा. प्रेम आणि कृतज्ञता". विरुष्कावर सध्या शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे.






अनुष्काने 11 जानेवारी 2021 रोजी वामिकाला जन्म दिला होता. आता विरुष्का दुसऱ्यांदा आई-बाबा झाले आहेत. 15 फेब्रुवारी 2024 रोजी त्यांनी त्यांच्या दुसऱ्या बाळाचं 'अकाय'चं (Akaay) स्वागत केलं आहे.


संबंधित बातम्या


Virat Kohli Anushka Sharma : विराट-अनुष्काला पुत्ररत्न! 'अकाय'च्या आगमनाने आमच्या जीवनात रंग भरले, इन्स्टाग्राम पोस्टमधून अनुष्काची माहिती