Liger : दक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) आणि अनन्या पांडेचा (Ananya Panday) 'लायगर' सिनेमा येत्या 25 ऑगस्ट 2022 रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाची पहिली झलक समोर आली आहे. या चित्रपटात टायगर श्रॉफसोबत 'स्टुडंट ऑफ द इयर 2' सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अनन्या पांडे या साऊथ स्टार विजय देवरकोंडासोबत रोमान्स करताना दिसणार आहे.


पाहा चित्रपटाची पहिली झलक



लोकप्रिय दिग्दर्शक पुरी जगन्नाध यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात अनेक रोमांचक पैलू दिसणार आहेत. सिनेमात अनेक दिग्गज कलाकारांचा समावेश असणार आहे. या स्पोर्ट्स ड्रामामध्ये विजय देवराकोंडा पूर्वी कधीही न पाहिलेल्या अवतारात दिसणार येणार आहे. निर्मात्यांनी मुंबई, अमेरिका, लॉस वेगास, हैदराबाद इत्यादी ठिकाणी या चित्रपटाचे शूटिंग झाले आहे.






 


'लायगर' चित्रपटामध्ये रम्या कृष्णन, रॉनित रॉय, विशू रेड्डी, अली, मकरंद देशपांडे हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. 'लायगर' चित्रपट पुरी जगन्नाथ आणि चार्मी कौर यांच्या 'पुरी कनेक्ट्स' आणि करण जोहरच्या 'धर्मा प्रॉडक्शन्स'च्या बॅनरखाली सहनिर्मिती केला आहे.


'लायगर' चित्रपटाची टीम शूटच्या शेवटच्या टप्प्यात आहे. त्यांनी दुबई, यूएस आणि लॉस वेगासमध्ये चित्रपटाचे बरेचसे चित्रीकरण केले आहे. 25 ऑगस्ट रोजी हा चित्रपट सर्व भाषांमध्ये जगभरातील सिनेमाघरांमध्ये दाखल होईल.


इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha