एक्स्प्लोर
बंगळुरुच्या विजयानंतर विराट-अनुष्काचं सेलिब्रेशन
मुंबई : आयपीएलमध्ये कमाल दाखवणाऱ्या विराट कोहलीसोबत अनुष्का शर्मा पुन्हा एकदा दिसली आहे. आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने विजय मिळवल्यानंतर झालेल्या सेलिब्रेशनला अनुष्का विराटला शुभेच्छा देण्यासाठी आली होती.
आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने 14 मे रोजी गुजरात लायन्सचा धुव्वा उडवला. त्यानंतर आरसीबीतर्फे डिनरचं आयोजन करण्यात आलं. ईडीओ या जपानी रेस्टॉरंटमध्ये झालेल्या सेलिब्रेशनला अनुष्काही उपस्थित होती. विशेष म्हणजे दोघांनी शेफसोबत फोटोही काढले.
विराट आणि अनुष्का यापूर्वीही वांद्र्याच्या एका पबमध्ये एकत्र डिनर करताना दिसले होते. आशिया कपमध्ये पाकवर मिळवलेल्या विजयानंतर अनुष्काने विराटला मेसेज केला होता.टी 20 विश्वचषकात ऑस्ट्रेलियावर मिळवलेल्या विजयानंतर अनुष्कावर सोशल मीडियावर वेगवेगळ्या कमेंट्स केल्या जात होत्या. त्यामुळे विराटने जाहीर नाराजी व्यक्त केली होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement