Anushka Sharma : बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माचा (Anushka Sharma) आगामी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'चकदा एक्सप्रेस' (chakda xpress) असे या सिनेमाचे नाव आहे. या सिनेमात अनुष्का भारतीय क्रिकेट महिला संघाची वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीच्या भूमिकेत दिसणार आहे. आता झुलन गोस्वामीची भूमिका साकारण्यासाठी अनुष्का सज्ज झाली आहे. 


क्रिकेटर झूलन गोस्वामीची भूमिका साकारण्यासाठी अनुष्का शर्मा सज्ज झालेली आहे. या झूलन गोस्वामीची भूमिका साकारण्यासाठी अनुष्काने प्रशिक्षण घ्यायलादेखील सुरुवात केली आहे. अनुष्काचे प्रशिक्षण दरम्यानचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. या फोटोत अनुष्का कॅज्युअल लूकमध्ये दिसत आहे.





'चकदा एक्सप्रेस' सिनेमाच्या माध्यमातून अनुष्का शर्मा महिला क्रिकेटपटू झुलन गोस्वामीचे आयुष्य मोठ्या पडद्यावर दाखवताना दिसणार आहे. या सिनेमासाठी अनुष्का शर्मा खूप मेहनत घेत आहे. 'चकदा एक्सप्रेस' हा सिनेमा नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.


संबंधित बातम्या


Lafda Zala : बिग बींचा ‘स्वॅगर’ लूक, ‘झुंड’चे ‘लफडा झाला’ गाणे प्रेक्षकांच्या भेटीला!


Toolsidas Junior Trailer : संजय दत्तच्या 'तुलसीदास ज्युनियर' सिनेमाचा ट्रेलर आऊट


Gangubai Kathiawadi : इमान..धर्म...धंदा.. रहिमलाला येतोय, अजय देवगणच्या पात्राची पहिली झलक


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha