Sonalee Kulkarni : शिवजयंतीनिमित्त सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. ठिकठिकाणी शिवरायांना वंदन केलं जात आहे. सोशल मीडियावरुनदेखील शिवरायांना मानवंदना दिली जात आहे. मराठमोठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनेदेखील (Sonalee Kulkarni) सोशल मीडियाच्या माध्यमातून शिवरायांना मानवंदना दिली आहे. 


सोनालीने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोत ती पारंपारिक पेहरावात दिसत आहे. तसेच तिच्या मागे छत्रपती शिवरायांची एक सुरेश मूर्तीदेखील दिसत आहे. सोनालीने फोटो शेअर करत शिवरायांना मानवंदना देत कॅप्शन लिहिली आहे,"महाराजांबद्दलचे प्रेम, कौतुक, आदर, श्रद्धा, अभिमान, आपुलकी, माझ्या डोळ्यांत दिसत आहेत. त्यामुळेच मी हा फोटो शेअर केला आहे".





छत्रपती ताराराणींची भूमिका साकारणार सोनाली कुलकर्णी 
छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्याला अबाधित राखण्याचे काम त्यांच्या निधनानंतर अनेक छत्रपतींनी केले. पण या स्वराज्य रक्षणाच्या कार्यात महत्त्वाच्या ठरतात त्या छत्रपती ताराराणी. लवकरच सोनाली कुलकर्णी 'मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी' या सिनेमातून छत्रपती ताराराणींच्या भूमिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा सिनेमा 2022 च्या दिवाळीत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 


संबंधित बातम्या


Bal Shivaji : छत्रपती शिवरायांच्या बालपणीचा जीवनप्रवास, रवी जाधव दिग्दर्शित 'बाल शिवाजी' चित्रपट डोळ्यासमोर उभा करणार स्वराज्याचा पाया!


Toolsidas Junior Trailer : संजय दत्तच्या 'तुलसीदास ज्युनियर' सिनेमाचा ट्रेलर आऊट


Farhan Shibani Wedding Photo : शुभमंगल सावधान! फरहान-शिबानी अडकले लग्नाच्या बेडीत, 'या' खास पद्धतीने केलं लग्न


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha