Gangubai Kathiawadi : संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांनी दिग्दर्शित केलेला 'गंगूबाई काठियावाडी' (Gangubai Kathiawadi) सिनेमा 25 फेब्रुवारी 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि अजय देवगण (Ajay Devgn) प्रमुख भूमिकेत आहेत.





'गंगूबाई काठियावाडी' सिनेमात अजय देवगण रहिमलालाचे पात्र साकारणार आहे. नुकतीच अजयच्या पात्राची झलक प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या व्हिडीओमध्ये अजय डॅशिंग लूकमध्ये दिसत आहे. अजयने त्याच्या पात्राची झलक दाखवणारा व्हिडीओ शेअर करत लिहिले आहे,"इमान..धर्म...धंदा.. आम्ही येत आहोत सहा दिवसांत".






'गंगूबाई काठियावाडी' सिनेमाची कथा काय आहे?
आलिया भट्टचा 'गंगूबाई काठियावाडी' सिनेमा बायोग्राफिकल ड्रामा आहे. आलिया भट्ट या चित्रपटात 'गंगूबाई'ची भूमिका साकारत आहे. गंगूबाईला तिच्याच नवऱ्याने 500 रुपयांना विकले होते. या चित्रपटाची कथा लेखक हुसैन झैदी यांच्या 'माफिया क्वीन्स ऑफ मुंबई' या पुस्तकावर आधारित आहे. गंगूबाईंच्या आयुष्यातील प्रत्येक पैलूला स्पर्श करण्याचा प्रयत्न या सिनेमात करण्यात आला आहे. एक सामान्य मुलगी कामाठीपुराची क्वीन कशी बनते, हे सर्व या सिनेमात पाहायला मिळेल.


संबंधित बातम्या


Farhan Shibani Wedding Photo : शुभमंगल सावधान! फरहान-शिबानी अडकले लग्नाच्या बेडीत, 'या' खास पद्धतीने केलं लग्न


Bal Shivaji : छत्रपती शिवरायांच्या बालपणीचा जीवनप्रवास, रवी जाधव दिग्दर्शित 'बाल शिवाजी' चित्रपट डोळ्यासमोर उभा करणार स्वराज्याचा पाया!


Pawankhind : 'पावनखिंड' सिनेमाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर घातला धुमाकूळ, लागला हाऊसफुल्लचा बोर्ड


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha