Aaliyah Kashyap-Shane Gregoire : बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपची (Anurag Kashyap) लेक ही लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. अनुरागने त्याच्या लेकीच्या हळदीचे फोटो त्याच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत. आलिया कश्यप (Aaliyah Kashyap) काही दिवसांतच तिचा बॉयफ्रेंड शेन ग्रेगोयरशी (Shane Gregoire) लग्न करणार आहे. आलिया आणि शेनने 2023 मध्ये साखरपुडा केला होता.                              


रिपोर्ट्सनुसार, अनुराग कश्यपच्या लेकीचं लग्न मुंबईतील महालक्ष्मी रेसकॉर्स येथे पार पडणार आहे. आलिया तिच्या सोशल मीडियावर शेनसोबतचे बरेच फोटो शेअर करत असते. अनुराग कश्यपचा जावाई हा एक उद्योजक असून तो मूळचा अमेरिकेचा आहे. 24 व्या वर्षीच तो उद्योजक म्हणून नावारुपाला आला आहे.                                    


बऱ्याच काळापासून करत होते एकमेकांना डेट


आलिया आणि शेन हे बऱ्याच काळापासून एकमेकांना डेट करत होते. लॉकडाऊनपासूनच ते एकत्र राहतही होते. पण 2023 मध्ये शेनने आलियाला लग्नासाठी विचारलं. त्यानंतर त्या दोघांनी साखरपुडाही उरकला. आलिया ही एक युट्युबर आहे. आलिया आणि शेनच्या साखरपुड्याला बरेच बॉलिवूडमधले स्टारकिड्स हजर होते. खुशी कपूर, सुहाना खान, अगस्त्य नंदा, इब्राहिम अली खान, पलक तिवारी यांचा समावेश होता.                                              


कोण आहे अनुराग कश्यप (Who is Anurag Kashyap)


अनुराग कश्यप बॉलिवूडचा लोकप्रिय दिग्दर्शक, निर्माता आणि पटकथालेखक आहे. दिग्दर्शक म्हणून त्याचे ब्लॅक फ्रायडे, नो स्मोकिंग, देव डी, गुलाल, दॅड गर्ल ईन यलो बुट्स आणि गँग्स ऑफ वासेपूर हे चित्रपट लोकप्रिय झाले आहेत. अनुराग कश्यपच्या आगामी चित्रपटांची चाहत्यांना आता उत्सुकता आहे. 






ही बातमी वाचा : 


शॉर्ट ड्रेस, मोकळे केस, बॉलिवूडची स्लीमगर्ल मलायका अरोरा एपी ढिल्लोनच्या गाण्यावर थिरकली, लाईव्ह कॉन्सर्टमधील व्हिडीओ पाहिलात का?