मुंबई : गायक दिलजित दोसांज (Diljit Dosanjh) सध्या चांगलाच चर्चेत आहे. त्याच्या गाण्याचे लाईव्ह कॉन्सर्ट अख्ख्या भारतात होत आहेत. विशेष म्हणजे त्याच्या प्रत्येक शोला त्याचे चाहते लाखोंनी गर्दी करत आहेत. नुकतेच दिलजितचा बंगळुरू शहरात एक दमदार लाईव्ह कॉन्सर्ट पार पडला. या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये अभिनेत्री दीपिका पादुकोणही (Deepika Padukone) जातीनं हजर होती. दरम्यान, एकीकडे दिलजितच्या या कॉन्सर्टची चर्चा होत असताना आता ए वी ढिल्लोनचा (A P Dhillon) मुंबईतील लाईव्ह कॉन्सर्ट चर्चेत आला आहे. या कॉन्सर्टमध्ये बॉलिवूडची स्लीमगर्ल मलायका अरोरा (Malaika Arora) झळकली आहे. 


मलायका अरोराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल


मलायका अरोराने ए पी ढिल्लोनच्या लाईव्ह कॉन्सर्टला हजेरी लावली. विशेष म्हणजे ढिल्लोननेही तिला थेट स्टेजवर बोलवून तिचं जोमात स्वागत केलं. मलायकासाठी त्याने खास गाणंदेखील गायलं. त्याच्या गाण्यावर मलायका अरोरा थिरकताना दिसली. तिच्या या डान्सचे काही व्हिडीओ सध्या शोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मलायका या व्हिडीओमध्ये काळ्या रंगाच्या शॉर्ट ड्रेसमध्ये दिसत आहे. 






लाईट मेकअप अन् शॉर्ट ड्रेस


दुसरीकडे एपी ढिल्लोनने लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रेक्षकांचे चागंलेच मनोरंजन केले. पण मध्येच त्याने मलायका अरोराला वर बोलवलून तिचे स्वागत केले. मलायका या कॉन्सर्टसाठी अगदीच कॅज्यूअल लूकमध्ये आली होती. तिने केस मोकळे सोडले होते. यासह मिनिमल मेकअपमध्ये असल्यामुळे ती आणखीनच गोड दिसत होती. मलायकाला स्टेजवर बोलवून एपी ढिल्लोनने तिची प्रशंसा करताना मलायका माझी लहानपणीची क्रश होती, असं सांगितलं. 






अर्जुन कपूरसोबत झालं ब्रेकअप


दरम्यान, एपी ढिल्लोन हा प्रसिद्ध गायक आहे. त्याने गायलेले ब्राऊन मुडे, समर होई, मोस्ट वाॉन्टेड हे गाणे फारच प्रसिद्ध  झाले. तर मलायका अरोराचा पहिला चित्रपट 1998 साली आला होता. या चित्रपटाचे नाव गुड नाल इश्क मिठा असं होतं. चल छैयां छैया या गाण्यामुळे मलायका अरोराल चांगलीच प्रसिद्धी मिळाली होती. काही दिवसांपूर्वी तिचं आणि अभिनेता अर्जुन कपूरचं ब्रेकअप झालं. आता हे दोघेही सिंगल आहेत. 


हेही वाचा :


आधी निमोनिया, आता चालायला त्रास, 'पडोसन' फेम सायरा बानू यांच्या प्रकृतीविषयी मोठी अपडेट समोर!


देसीगर्ल प्रियांकाची परी दिसते तरी कशी? पाहा जोनस मॅडमचे लेकीसोबतचे खास Unseen Photo


पांढऱ्या दाढीतील रहस्यमयी माणूस, भविष्य सांगितलं अन् गायब, विवेक ओबेरॉयने सांगितला भेटलेल्या साधूचा 'तो' प्रसंग!