एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
जिममध्ये एक्सरसाईज, अनुपम खेरना सलमानचे चिमटे
मुंबई: बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्यांपैकी एक असलेले अनुपम खेर चित्रपटातील अभिनयासोबतच सोशल मीडियावरही सर्वाधिक अॅक्टिव्ह असतात. ट्विटर आणि फेसबूकवरूनही त्यांना फॉलो करणारा मोठा वर्ग आहे. सध्या अनुपम खेर जिममध्ये बॉडी बनवण्यासाठी कठोर परिश्रम करत आहेत.
६१ वर्षीय खेर एकाद्या तरुणाप्रमाणेच जिममध्ये वर्कआउट करत आहे. त्यामुळे यांचे जिममधील एक्सरसाईज करतानाचे फोटो बॉलिवूडचा दबंग खान सलमानने आपल्या ट्विटरवर पोस्ट केले आहेत. तसेच त्यावरील कमेंटमध्ये सलमानने अनुपम खेर यांना चिमटे काढले आहेत.
सलमानने आपल्या ट्वीटमध्ये 'उपरवाला, बॉडी बिल्डर्स की खेर करे' असे म्हणले आहे. सलमानच्या या ट्वीटला खेर यांनी फेसबूकवरुन उत्तर दिले आहे. त्यांनी आपल्या फेसबूक पेजवर, ''माझे फोटो ट्वीटर आणि इंस्टाग्रामवर पोस्ट केल्याबद्दल सलमानचे आभार मानतो. मला तुझी कमेंट आवडली. जय हो,'' असे लिहले आहे.Uper walla body builders ki kher Karen @AnupamPkher pic.twitter.com/qxjNWeQLwo
— Salman Khan (@BeingSalmanKhan) August 26, 2016
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
गडचिरोली
राजकारण
निवडणूक
क्रीडा
Advertisement