Bollywood Celebrities :  लोकांना चित्रपट सोडून प्रत्येक ठिकाणी बॉलिवूड (Bollywood) कलाकार पाहायला अक्षरश: वेडे होतात. चाहत्यांना त्यांच्या आवडत्या कलाकारांना पाहण्यासाठी नेहमीच चित्रपटांची वाट पाहावी लागत नाही. कोणत्यातरी कार्यक्रमाच्या निमित्ताने त्याच्या लाडक्या कलाकारांना ते प्रत्यक्षातही भेटू शकतात. चित्रपटांव्यतिरिक्त बॉलीवूड सेलिब्रेटी ब्रँड एंडोर्समेंटमधून भरपूर कमाई करतात. प्रत्येक जाहिरातीसाठी ते लाखो रुपये घेतात. याशिवाय मोठ्या उद्योगपतींच्या लग्नातही ही सेलिब्रिटी मंडळी पाहायला मिळतात. त्या डान्स परफॉर्मन्ससाठीही ते लाखो रुपये घेतात. 


पण तुम्हाला माहित आहे का एखाद्या व्यक्तीच्या अंत्यसंस्कारात सहभागी होण्यासाठी काही बॉलीवूड मंडळी मानधन घेतात. बॉलीवूड कलाकार एका चित्रपटासाठी करोडो रुपये मानधन आकारत असल्याचं पाहायला मिळतं. पण तरीही वर्षातून केवळ 1 ते 2 सिनेमे केल्याने या कलाकार मंडळींची घरं चालत नाहीत. त्याच्यासाठी त्यांना इतरही मार्ग शोधावे लागतात. नुकतच एका प्रसिद्ध बॉलीवूड सेलिब्रेटीने यावर भाष्य केलं आहे. 


अभिनेत्याने केला खुलासा


बॉलिवूड सेलिब्रिटींना अनेक लग्नसमारंभात डान्स करताना आपण पाहतोच. हे पाहिल्यानंतर आपल्याला असं वाटतं की,  ज्याचे लग्न होणार आहे तो किती भाग्यवान असेल की त्याच्या लग्नासाठी स्टार्स आले आहेत. पण हा अत्यंत चुकीचा समज असल्याचा एका बॉलीवूड सेलिब्रेटीने म्हटलं आहे. हे बॉलीवूड सेलिब्रेटी लग्नाला येण्यासाठी पैसे घेतात. इतकच नाही तर त्यांनी जर परफॉर्म केले तर त्यासाठी वेगळे चार्जेस घेतात. पण आणखी एक काळी बाजू अभिनेता अनुज सोहनी याने यावेळी सांगितली आहे.


बिग स्मॉल टॉक नाऊ शोमध्ये अनुजने म्हटलं की, एका मोठ्या स्टारची कमाई ही लग्नसमारंभातून होते. त्याचप्रमाणे कोणाच्याही अंत्यसंस्कार आणि तेराव्या दिवशी उपस्थित राहण्याचेही बॉलीवूड मंडळी पैसे घेतात.अनेकांना या गोष्टीबद्दल माहीतही नाहीये. कुणी विचारही केला नसेल की हे असं काही असेल. त्यांच्या किमतीदेखील ठरलेल्या असतात. या कार्यक्रमासाठी एवढे पैसे घ्यायचे असं त्यांच्या किमती ठरलेल्या असतात., असा धक्कादायक खुलासा यावेळी अनुजने केला आहे.  






ही बातमी वाचा : 


Bollywood Actress :प्रसिद्ध अभिनेत्रीसाठी IVF ठरली मोठी चूक, प्रेग्नंसीदरम्यान झाला गंभीर आजार; दुसऱ्यांदा आई होताना सांगितल्या गर्भपाताच्या वेदना