Salman Khan And Aayush Sharma Movie Antim New Song Chingari: सलमान खान आणि आयुष शर्माचा (Salman Khan And Aayush Sharma) 'अंतिम-द फायनल ट्रुथ' (Antim: The Final Truth) सिनेमा सध्या चर्चेत आहे. 'भाई का बर्थडे' आणि 'होने लगा' या गाण्यानंतर सिनेमातील नवे गाणे 'चिंगारी' प्रदर्शित झाले आहे. यात सलमानची मैत्रिण वलूचा डिसूजा (Valucha D'souza) आयटम सॉंगवर नाचताना दिसून येत आहे. सलमानने हे गाणे प्रदर्शित झाल्याची माहिती सोशल मीडियावर दिली आहे. या गाण्याचे नाव चिंगारी (Chingari) असे असून त्यात वलूचा डिसूजा मराठमोळी लावणी करताना दिसून येत आहे.
वसूजाने या गाण्यावर नृत्य करत प्रेक्षकांना मराठमोळ्या अदांचे दर्शन घडवले आहे. प्रेक्षक तिच्या या नृत्याचे खूप कौतुक करताना दिसून येत आहेत. सलमान खान आणि आयुष शर्माच्या अंतिम (Antim) सिनेमातील चिंगारी हे गाणे गायिका सुनिधी चौहानने (Sunidhi Chauhan) गायले आहे. तर या गाण्याची कोरिओग्राफी कृती महेश यांनी केली आहे. तर या गाण्याचे बोल वैभव जोशींनी लिहिले आहेत. या गाण्याला हितेश मोडकने संगीत दिले आहे.
'चिंगारी' पूर्वी 'अंतिम' सिनेमातील 'होने लगा' हे रोमॅंटिक गाणे प्रदर्शित झाले होते. 'होने लगा' या गाण्यात आयुष शर्मा आणि महिमा मकवानाचा बोल्ड अंदाज पाहायला मिळाला. हे गाणे जुबिन नौटियालने गायले आहे. तर या गाण्याचे बोल शब्बीर अहमदने लिहिले आहेत.
'भाई का बर्थडे' गाणे प्रेक्षकांच्या पसंतीस
'अंतिम' सिनेमातील 'भाई का बर्थडे' हे गाणे एक पार्टी सॉन्ग आहे. 'भाई का बर्थडे' या गाण्याला प्रदर्शित होताच काही वेळात एक लाखापेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले होते. एकंदरीतच या गाण्याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. मराठीतील मुळशी पॅटर्न सिनेमातील 'भाई चा बर्थडे' गाणेदेखील प्रेक्षकांच्या पसंतीस पडले होते.