Annaatthe Movie Collection : प्रसिद्ध अभिनेते रजनीकांत(Rajinikanth)  यांचा  'अन्नत्थे'(Annaatthe) हा चित्रपट 4 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झाला. एका रिपोर्टनुसार, अन्नत्थे  या चित्रपटाने  प्रदर्शित झाल्यानंतर फक्त 7 दिवसांतच जवळपास 200 कोटींची कमाई केली आहे. हे चित्रपटाचे वर्ल्डवाइड बॉक्स ऑफिस कलेक्शन (Box Office) आहे.  रजनीकांत यांच्या जगभरातील चाहत्यांनी या चित्रपटाला पसंती दिली आहे.  


अन्नत्थे या चित्रपटाने रिलीज झाल्यानंतर पहिल्याच दिवशी 70.19 कोटी तर दुसऱ्या दिवशी 42.63 कोटी रूपयांची कमाई बॉक्स ऑफिसवर केली. तिसऱ्या  दिवशी 33.71 कोटी आणि चौथ्या दिवशी  28.20 कोटी रूपये  कमाई या चित्रपटाने केली. पाचव्या दिवशी- 11.85 कोटी सहाव्या दिवशी  9.50  आणि सातव्या दिवशी- 6.39 कोटी रूपये या चित्रपटाने कमवले. आत्तापार्यंत एकूण 202.47 कोटी रूपये या चित्रपटाने कमवले आहेत. चित्रपट आणि ट्रेड अॅनॅलिस्ट मनोबाला विजयबालन या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल माहिती सोशल मीडिया दिली होती.  




रजनीकांत यांचा 'अन्नत्थे'  या चित्रपटामध्ये त्यांच्यासोबतच  प्रकाश राज, जगपति बाबू, वेला राममूर्ति आणि सूरी  या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. तसेच चित्रपटात मीना, खुशबू सुंदर, नयनतारा  आणि कीर्ती सुरेश या अभिनेत्रींनी महत्वाची भूमिका साकारली आहे. 'बाशा', 'शिवाजी' आणि 'एंथिरन' या सुपर हिट चित्रपटांमधील रजनीकांत यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन  बीए राजू यांनी केले आहे.  या चित्रपटाचा टीझर 14 ऑक्टोबर रोजी या चित्रपटांचे निर्माते बीए राजू यांनी सोशल मीडियावर शेअर केला होता. रजनीकांत यांनी  अपूर्वा रागंगाल या चित्रपटातून तमिळ चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.


Rajkummar Rao And Patralekhaa Marriage: ड्रिम वेडिंगसाठी पत्रलेखाचा लेहंगा डिझाईन करणार 'हा' डिझायनर


सुपरस्टार रजनीकांत यांना काही दिवसांपूर्वी दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरवण्यात आले. रजनीकांत यांनी याबद्दल ट्वीट करत चाहत्यांना माहिती दिली होती. रजनीकांत यांनी ट्वीट करत सरकारचे आभार मानले होते.


Arbaaz Khan-Malaika Arora Divorce : मलायकासोबत घटस्फोटानंतर ट्रोल झाला होता अरबाज; दिले सडेतोड उत्तर