एक्स्प्लोर
अण्णा हजारेंवरील बायोपिकचा टीझर रिलीज

मुंबईः ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आयुष्यावर चित्रित केलेला सिनेमा 'अण्णा'चा टीझर रिलीज करण्यात आला आहे. भ्रष्टाचाराविरोधात केलेला जीवनभराचा संघर्ष या सिनेमातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. सैनिकापासून ते उपोषणांपर्यंतचा संघर्ष या टीझरमध्ये पाहायला मिळत आहे. सिनेमाचं दिग्दर्शन शशांक उडापूरकर यांनी केलं आहे. शशांक स्वतः या सिनेमात अभिनय करताना पाहायला मिळणार आहेत. अभिनेत्री काजोलची बहीण तनिशा मुखर्जी एका महिला पत्रकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. सिनेमात केवळ अण्णांच्या आंदोलनालाच नव्हे तर लहानपणापासूनच्या गोष्टींवर प्रकाश टाकण्यात आला आहे. टीझरमुळे प्रेक्षकांची उत्सुकता कमालीची वाढली आहे. 14 ऑक्टोबर रोजी हा सिनेमा रिलीज होत आहे. पाहा टीझरः
Before You Go
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस





















