एक्स्प्लोर
युद्धभूमी ते जंतरमंतर... अण्णांच्या बायोपिकचा ट्रेलर रिलीज

मुंबईः ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आयुष्यावर चित्रित केलेला सिनेमा ‘अण्णा’चा ट्रेलर रिलीज झाला आहे. भ्रष्टाचाराविरोधात केलेला जीवनभराचा संघर्ष या सिनेमातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. युद्धभूमी ते दिल्लीतील जंतरमंतरवरील आंदोलन आणि राळेगणसिद्धीच्या विकासाची मूळं कशी रोवली, ते या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे.
सिनेमाचं दिग्दर्शन शशांक उडापूरकर यांनी केलं आहे. शशांक स्वतः या सिनेमात अभिनय करताना पाहायला मिळणार आहेत. अभिनेत्री काजोलची बहीण तनिशा मुखर्जी एका महिला पत्रकाराच्या भूमिकेत दिसणार आहे.
माझा कट्टा : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंसोबत दिलखुलास गप्पा
सिनेमात केवळ अण्णांच्या आंदोलनालाच नव्हे तर लहानपणापासूनच्या गोष्टींवर प्रकाश टाकण्यात आला आहे. टीझरमुळे प्रेक्षकांची उत्सुकता कमालीची वाढली आहे. 14 ऑक्टोबर रोजी हा सिनेमा रिलीज होत आहे.पाहा ट्रेलरः
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
शेत-शिवार
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
