Ankita Walawalkar Meeting Suraj Chavan : बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वातील स्पर्धक यंदाच्या सीझनचा विजेता सूरज चव्हाणच्या गावी जाऊन त्याची भेट घेताना दिसत आहेत. एरिना, वैभव, जान्हवी यांनी सूरजची भेट घेतली. यानंतर अंकिता वालावलकर सूरजची भेट कधी घेणार असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. आता अखेर उशिरा का होईना पण, अंकिता सूरजला भेटायला पोहोचली आहे. कोकण हार्टेड गर्ल म्हणजेच अंकिता वालावलकर हिने सूरज चव्हाणच्या गावी जाऊन त्याची भेट घेतली आहे. यावेळी ती होणाऱ्या नवऱ्यासोबत पोहोचली होती. अंकिताने सूरजची उशिरा भेट घेण्याचं कारणही सांगितलं आहे.
होणाऱ्या नवऱ्याला घेऊन अंकिता पोहोचली सूरजच्या गावी
अंकिता वालावलकर सूरज चव्हाणच्या गावी पोहोचली. तिने या भेटीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. अंकिता सूरजच्या घरी गेल्यावर तिचं औक्षण करुन स्वागत करण्यात आलं. अंकिता वालावलकर तिचा होणारा नवरा कुणाल भगत याच्यासोबत सूरजच्या गावी पोहोचली. दोघांनी सूरजच्या कुटुंबासोबत रानात जाऊन चटणी-भाकर खाल्ली. यावेळी कुणालने लहान मुलंसोबत खेळण्याचा आनंद घेतला. अंकिताने मंदिरात जाऊन दर्शन घेतलं आणि चाहत्यांसोबत फोटोही काढले. यावेळी चाहत्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.
शेतात घेतला चटणी-भाकर खाण्याचा आनंद
उशिरा भेट घेण्याचं सांगितलं कारण
अंकिताने सूरज चव्हाणची उशिरा भेट घेण्याचं कारणही सांगितलं आहे. एका पोस्टमध्ये अंकिताने लिहिलंय, "सूरजचं गांव… बिग बॉसनंतर भेटायचं म्हटलं तर, त्याच्याकडे होणाऱ्या गर्दीचा विचार करुन मी आरामात भेटायचं ठरवलं खरं पण त्याला वाटू लागलं की, पॅडी दादा आणि अंकिता ताई येत का नाहीत. खरतर माझ्या त्रासासाठी नाही पण त्याला होणारा त्रास कमी होईल म्हणून उशीरा भेट घ्यायची होती. रोज असणारी फोटोसाठी प्रचंड गर्दी आणि महाराष्ट्राच प्रेम त्याच्यामागे असंच कायम राहुदे…आणि हो लग्नाचं आमंत्रण पण दिल मी".
महत्त्वाच्या इतर बातम्या :