Anikita Lokhande Vicky Jain Wedding Anniversary : अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि विकी जैन (Vicky Jain) सध्या 'बिग बॉस 17' (Bigg Boss 17) या कार्यक्रमामुळे चर्चेत आहेत. दोघेही सध्या छोटा पडदा गाजवत आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून ते 'बिग बॉस 17' गाजवत आहेत. 


'बिग बॉस 17' मधील सर्वात चर्चेत असणारं कपल अंकिता लोखंडे आणि विकी जैन आहे. आता बिग बॉसच्या घरात ते लग्नाचा वाढदिवस साजरा करणार आहेत. अंकिता आणि विकी 14 डिसेंबरला लग्नाचा दुसरा वाढदिवस साजरा करणार आहेत. 2021 मध्ये ते लग्नबंधनात अडकले होते. मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये त्यांचा लग्नसोहळा पार पडला होता. 


अंकिता लोखंडे आणि विकी जैनची लव्हस्टोरी जाणून घ्या... (Ankita Lokhande Vicky Jain Love Story)


सुशांतपासून विभक्त झाल्यानंतर अंकिता पूर्णपणे तुटली होती. त्यानंतर अंकिताने एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून विकी जैनची भेट घेतली. पहिल्या भेटीनंतर दोघेही एकमेकांना खूप भेटू लागले आणि त्यांना एकमेकांसोबत वेळ घालवायला आवडू लागले. अंकिता डिप्रेशनमध्ये होती तेव्हा विकीने तिला त्यातून बाहेर पडण्यासाठी खूप मदत केली. हळूहळू दोघेही प्रेमात पडले. 2019 मध्ये, अंकिता लोखंडेला विकी जैनने खूप रोमँटिक पद्धतीने प्रपोज केले होते. दिर्घकाळ एकमेकांना डेट केल्यानंतर अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांनी 14 डिसेंबर 2021 रोजी लग्न केले.


अंकिता लोखंडेबद्दल जाणून घ्या... 


अंकिता सोशल मीडियावर सक्रिय आहे. तिच्या प्रत्येक पोस्टवर चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत असतात. 'पवित्र रिश्ता' (Pavitra Rishta) या मालिकेच्या माध्यमातून अंकिता घराघरात पोहोचली. 'पवित्र रिश्ता'सह 'झलक दिखला जा 4','कॉमेडी सर्कस' आणि 'एक थी नायिका' या छोट्या पडद्यावरील कार्यक्रमांतदेखील अंकिताने काम केलं आहे. आता अंकिताच्या आगामी प्रोजेक्टची चाहत्यांना उत्सुकता आहे. 


विकी जैनबद्दल जाणून घ्या... 


विकी जैन हा छत्तीसगड येथील रायपुरात राहणारा आहे. तो एक उद्योगपती आहे. पण कामामुळे तो मुंबईत असतो. मीडिया रिपोर्टनुसार, विकी जैनचं खरं नाव विकास कुमार जैन आहे. विकीच्या वडिलांचं नाव विनोद कुमार जैन असून आईचं नाव रंजना जैन आहे. विकीचं शालेय शिक्षणंही मुंबईत झालं आहे. शिक्षण पूर्ण केल्यानंतर विकी जैनने व्यवसाय सांभाळायला सुरुवात केली. 'महावीर कोल वॉशरीज प्राइवेट लिमिटेड' या कंपनीचा तो एमडी होता. तसेच महावीर इंस्पायर ग्रुपचा तो को-ओनरदेखील होता. 


संबंधित बातम्या


Bigg Boss 17 : विकी जैनसाठी अंकिता लोखंडे इन्वेस्टमेंट; ईशा मालवीयचा खुलासा