Alia Bhatt : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) सध्या चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी आलियाचा 'गंगूबाई काठियावाडी' (Gangubai Kathiawadi) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर दणदणीत कमाई केली. तर दुसरीकडे अभिनेत्रीच्या कामाचंदेखील कौतुक झालं. अनेक पुरस्कार सोहळ्यात या सिनेमातील अभिनयासाठी आलियाचा गौरव करण्यात आला. आता या सिनेमानंतर आलिया लवकरच एका बायोपिकच्या माध्यमातून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

'या' बायोपिकच्या माध्यमातून आलिया भट्ट येणार प्रेक्षकांच्या भेटीला (Alia Bhatt Biopic)

आलियाचा 'गंगूबाई काठियावाडी' हा सिनेमा काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. मुंबईच्या माफिया क्वीन गंगूबाई यांच्यावर आधारित असलेला हा सिनेमा चांगलाच गाजला. सिनेनिर्माते, दिग्दर्शक हंसत मेहता (Hansal Mehta) यांच्या आगामी सिनेमात आलिया भट्ट मुख्य भूमिकेत दिसणार असल्याचं म्हटलं जात आहे. 

हंसत मेहता यांचा सिनेमा बायोपिक असणार आहे. गेल्या काही दिवसांपासून हंसल मेहता आणि आलिया भट्ट यांच्यात या सिनेमासंदर्भात चर्चा होत आहे. एका वृत्तनिवेदिकेच्या आयुष्यावर हा सिनेमा आधारित असणार आहे. सध्या हंसत मेहता आणि आलिया यांच्यात या सिनेमाबद्दल चर्चा सुरू असून याबद्दल ते या सिनेमाच्या तयारीला सुरुवात करणार असल्याचं म्हटलं जात आहे. या सिनेमात आलिया भट्ट वृत्तनिवेदिकेच्या भूमिकेत दिसणार आहे.

शूटिंग कधी होणार सुरू? 

आलिया भट्ट आणि हसंत मेहता यांच्या आगामी सिनेमाच्या शूटिंगला लवकरच सुरुवात होणार आहे. 2024 च्या मध्यात या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

आलिया भट्ट सध्या वासन बाला दिग्दर्शित 'जिगरा' या सिनेमाचं शूटिंग करत आहे. त्यानंतर ती संजय लीला भन्साळी यांच्या 'बैजू बावरा' या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. 'बैजू बावरा' या सिनेमात आलिया भट्टसह रणवीर सिंह (Ranveer Singh) स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. तर दुसरीकडे हंसल मेहता सध्या त्यांच्या आगामी 'गांधी' या वेबसीरिजच्या प्री प्रोडक्शनमध्ये व्यस्त आहेत. प्रतीक गांधी अभिनीत या सीरिजच्या शूटिंगला पुढील महिन्यात सुरुवात होणार आहे.

संबंधित बातम्या

Alia Bhatt : आलिया भट्ट सुद्धा 'डीपफेक'ची शिकार? थेट व्हिडिओ व्हायरल झाल्याने चिंता वाढली