Ranbir Kapoor Rashmika Mandanna Animal First Song Hua Main Out : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) सध्या 'अॅनिमल' (Animal) या सिनेमामुळे चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी या सिनेमाचा ट्रेलर आऊट झाला असून आता या सिनेमातील पहिलं गाणं 'हुआ मैं' (Hua Main) प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. 


'अॅनिमल' सिनेमातील 'हुआ मैं' गाण्याचा धुमाकूळ


'अॅनिमल' या सिनेमातील 'हुआ मैं' हे गाणं आता प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. युट्यूबवर हे गाणं सध्या ट्रेडिंगमध्ये आहे. 'हुआ मैं' या गाण्यात रणबीर आणि रश्मिकाचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळत आहे. या गाण्यात रणबीर आणि रश्मिका लिपलॉक करतानाही दिसत आहेत. त्यांची केमिस्ट्री चाहत्यांच्या पसंतीस उतरली आहे. 


रणबीर कपूर आणि रश्मिका मंदानाने 'हुआ मैं' या गाण्याच्या माध्यमातून सोशल मीडियावर चांगलाच धमाका केला आहे. हे गाणं चाहत्यांच्या पसंतीस उतरलं आहे. रोमान्सचा किंग रणबीर कपूर, रणबीर भावाचा पुन्हा तोच अंदाज, अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. 




बॉक्स ऑफिस गाजवण्यासाठी रणबीर कपूर सज्ज!


रणबीर कपूर आणि रश्मिका मंदानाचा 'अॅनिमल' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालणार आहे. या सिनेमाच्या माध्यमातून अभिनेता पुन्हा एकदा अॅक्शन मोडमध्ये दिसणार आहे. रणबीर कपूरचा 'अॅनिमल' हा सिनेमा शाहरुखच्या 'जवान'चा आणि सनी देओलच्या 'गदर 2' या सिनेमाचा रेकॉर्ड मोडणार असेही म्हटले जात आहे. या सिनेमात बॉबी देओलही महत्त्वाच्या भूमिकेत दिसेल. बॉक्स ऑफिसवर आता हा सिनेमा किती कोटींचा गल्ला जमवणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.


'त्या' पोस्टरमुळे रणबीर कपूर ट्रोल


रणबीर कपूर आणि रश्मिका मंदानाच्या 'अॅनिमल' या सिनेमातील एका गाण्याचं पोस्टर आऊट झालं आणि या जोडीला नेटकऱ्यांनी ट्रोल करायला सुरुवात केली. या पोस्टरमध्ये रणबीर आणि रश्मिका लिपलॉक करताना दिसत होते. 'अॅनिमल' या सिनेमाच्या माध्यमातून रणबीर-रश्मिका पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. संदीप रेड्डी वांगा या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहेत. 


संबंधित बातम्या


Ranbir Kapoor : रणबीरने वाढदिवशी चाहत्यांना दिली खास भेट; 'Animal'चा धमाकेदार टीझर आऊट!