Sunny Deol Entry in Ramayana : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि साई पल्लवी (Sai Pallavi) सध्या नितेश तिवारीच्या 'रामायण' (Ramayana) या सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमात दाक्षिणात्य अभिनेता यशची एन्ट्री होणार आहे. आता या सिनेमासंदर्भात एक नवी अपडेट समोर आली आहे. बॉलिवूड अभिनेता 'गदर 2' (Gadar 2) फेम सनी देओल (Sunny Deol) या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार असल्याचं समोर आलं आहे. 


'रामायण'मध्ये सनी देओल दिसणार 'या' भूमिकेत


नितेश तिवारीचा 'रामायण' हा सिनेमा सध्या चर्चेत आहे. रणबीर कपूर, साई पल्लवी, यश मुख्य भूमिकेत असलेल्या या सिनेमात आता नुकतचं बॉक्स ऑफिस गाजवलेल्या सनी देओलची एन्ट्री झाली आहे. मीडिया रिपोर्टनुसार,'रामायण' या सिनेमात सनी देओल हनुमानाच्या भूमिकेत दिसणार आहे. अद्याप या संदर्भात अधिकृत माहिती समोर आलेली नाही. 


'रामायण' या सिनेमात रणबीर कपूर राम आणि साई पल्लवी सीता मातेच्या भूमिकेत दिसणार आहे. तर दाक्षिणात्य सुपरस्टार यश या सिनेमात रावणाच्या भूमिकेत दिसेल. आता सनी देओल हनुमानाच्या भूमिकेत दिसणार असल्याचं समोर आलं आहे.


'रामायण'च्या शूटिंगला होणार सुरुवात


नितेश तिवारी दिग्दर्शित 'रामायण' या सिनेमाची सिनेप्रेमींना उत्सुकता आहे. 2024 मध्ये या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे. रामायण या सिनेमातील भूमिकेसाठी रणबीर कपूर खूप मेहनत घेत आहे. या भूमिकेला योग्य न्याय देता यावा यासाठी त्याने मांसाहार आणि दारू या गोष्टींचा त्याग केला आहे. 2025 मध्ये हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकतो. 


सनी देओलचा 'गदर 2' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात यशस्वी ठरला आहे. जगभरातील बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने चांगलीच कमाई केली आहे. भारतीय बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने 525 कोटींचा गल्ला जमवला. या सिनेमात सनी देओलसह अमीषा पटेल आणि उत्कर्ष शर्मा मुख्य भूमिकेत होते. तारा सिंह आणि सकीनाची जोडी चाहत्यांच्या पसंतीस उतरली. आता अभिनेत्याच्या आगामी सिनेमांची चाहत्यांना उत्सुकता आहे.






संबंधित बातम्या


Ranbir Kapoor: नॉन व्हेज, दारु अन् लेट नाईट पार्टी; चित्रपटातील श्रीरामांच्या भूमिकेसाठी रणबीर सोडणार 'या' सवयी