Happy Birthday Raashi Khanna : बॉलिवूडसह दाक्षिणात्य मनोरंजनसृष्टी गाजवणारी अभिनेत्री राशी खन्ना (Raashi Khanna) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. राशी आज एक उत्कृष्ट अभिनेत्री असून ती आज आपला 33 वा वाढदिवस साजरा करत आहे. पण खरंतर राशीला अभिनेत्री नव्हे तर आयएएस अधिकारी (IAS Officer) व्हायचं होतं. 


राशी खन्नाचा जन्म 30 नोव्हेंबर 1990 रोजी दिल्लीत झाला. आज इंडस्ट्रीतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींच्या यादीत तिची गणना होते. राशीने जॉन अब्राहमच्या 'मद्रास कॅफे' या सिनेमाच्या माध्यमातून आपल्या करिअरची सुरुवात केली. आज अभिनयक्षेत्रात तिने स्वत:ला सिद्ध केलं आहे. पण आईएएस अधिकारी होण्याचं तिचं स्वप्न होतं. 


'या' सिनेमाच्या माध्यमातून राशीचं बॉलिवूडमध्ये पदार्पण


दिल्लीत जन्मलेली राशी अभ्यासात आधीपासूनच हुशार होती. अभिनेत्री नव्हे तर आयएएस अधिकारी होण्याचं तिचं स्वप्न होतं. 'मद्रास कॅफे' या सिनेमाच्या माध्यमातून तिने मनोरंजनसृष्टीत पाऊल ठेवलं. या सिनेमात तिने रुबीची भूमिका साकारली होती. राशी एक अभिनेत्री असण्यासोबत एक उत्तम गायिकादेखील आहे. 'यू आर माय माय','विलेन' सारखी गाणी तिने गायली आहेत. 






राशी खन्ना होती टॉपर..


राशी खन्ना 12 वीमध्ये असताना वर्गात पहिली आली होती. इंडस्ट्रीतील टॉपची अभिनेत्री बारावीतदेखील टॉपर होती. अभिनेत्रीला जाहिरात क्षेत्रात कॉपीराइटर म्हणून काम करायचं होतं. करिअर म्हणून जाहिरात क्षेत्रात काम करण्याचा निर्णय तिने घेतला होता. पण आज बॉलिवूडसह दाक्षिणात्य मनोरंजनसृष्टीतील राशीचा बोलबाला आहे.


राशी खन्नाने हिंदीसह अनेक दाक्षिणात्य सिनेमांतही काम केलं आहे. 2014 मध्ये 'Uhalu Gasagusalde' या सिनेमाच्या माध्यमातून तिने साऊथमध्ये पदार्पण केलं. या सिनेमातील तिच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं. त्यानंतर रवी तेजासोबत 'बंगाल टायगर' सिनेमात केलेल्या रोमान्समुळे ती चर्चेत आली. 2015 मध्ये हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. राशीचा आता 'योद्धा' सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. या सिनेमात ती सिद्धार्थ मल्होत्रासोबत स्क्रीन शेअर करताना दिसेल.


राशी खन्ना सिनेमांसह सोशल मीडियावरदेखील चांगलीच अॅक्टिव्ह आहे. राशी नेहमीच तिच्या वैयक्तिक आयुष्यासंबंधित गोष्टी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर करत असते. राशीचे ग्लॅमरस फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरतात.