Vicky Kaushal Sam Bahadur OTT : बॉलिवूड अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) सध्या 'सॅम बहादुर' (Sam Bahadur) या सिनेमामुळे चर्चेत आहे. 1 डिसेंबर 2023 रोजी हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. रिलीजआधीपासून चर्चेत असणाऱ्या या सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आता सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.
'सॅम बहादुर' या सिनेमात विकी कौशलने सॅम मानेकशॉची भूमिका साकारली होती. अभिनेत्री फातिमा सना शेखने या सिनेमात दिवंगत प्रंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली होती. तर सान्या मल्होत्रा सॅमची पत्नी सिल्लूच्या भूमिकेत होती. तगडी स्टारकास्ट असलेला हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.
'या' ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार 'सॅम बहादुर'
'सॅम बहादुर' हा सिनेमा सिनेमागृहात रिलीज झाल्यानंतर ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. झी 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा सिनेमा रिलीज होईल, असं म्हटलं जात आहे. अद्याप ओटीटी रिलीज डेट समोर आलेली नाही.
'सॅम बहादुर' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा मेघना गुलजार यांनी सांभाळली आहे. तर आरएसवीपी मूव्हीजने या सिनेमाची निर्मिती केली आहे. ओटीटी प्लेच्या रिपोर्टनुसार, 55 कोटींमध्ये 'सॅम बहादुर' या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. टेलीचक्करनुसार, 'सॅम बहादुर' या सिनेमासाठी विकी कौशलने 10 कोटी मानधन घेतलं आहे. तर फातिमा सना शेखने 1 कोटी रुपयांचं मानधन घेतलं आहे.
'सॅम बहादुर' आणि 'अॅनिमल' हे दोन्ही सिनेमे बॉक्स ऑफिसवर आमने-सामने आहेत. 1 डिसेंबर 2023 रोजी हे दोन्ही सिनेमे प्रदर्शित झाले आहेत. 'अॅनिमल' हादेखील तगडी स्टारकास्ट असलेला सिनेमा आहे. या सिनेमात रणबीर कपूर, रश्मिका मंदाना, बॉबी देओल आणि अनिल कपूर मुख्य भूमिकेत आहेत. या दोन्ही सिनेमांची चांगलीच क्रेझ आहे.
तगडी स्टारकास्ट असलेला 'सॅम बहादुर'
'सॅम बहादुर' या सिनेमात विकी कौशलसह कतरिना कैफ, रेखा, अनन्या पांडे, विद्या बालन, राधिका मदान, निम्रत कौर आणि शहनाज गिल महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. या सिनेमाच्या स्पेशल स्क्रिनिंगला बॉलिवूड अभिनेता आदित्य रॉय कपूर, अर्जुन कपूर, सिद्धार्थ मल्होत्रा, रितेश देशमुख यांनी हजेरी लावली होती. 'सॅम बहादुर' या सिनेमासह विकी कौशल त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. अनेकदा तो पत्नी कतरिना कैफसोबतचे रोमँटिक फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असतो.
संबंधित बातम्या