Tripti Dimri And Vicky Kaushal: काही दिवसांपूर्वी रिलीज झालेल्या अॅनिलम (Animal) या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटामधील अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि बॉबी देओल या दोघांच्या अभिनयाचं अनेकजण कौतुक करत आहेत, अशातच रणबीर आणि तृप्ती डिमरी (Tripti Dimri) यांच्या अॅनिमल चित्रपटातील इंटिमेट सीन्सनं देखील अनेकांचे लक्ष वेधले आहे. अॅनिमल या चित्रपटामुळे तृप्ती ही भाभी-2 आणि झोया या नावांनी ओळखली जात आहे. तृप्ती ही सध्या अॅनिमल चित्रपटासोबतच सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या काही फोटोंमुळे देखील चर्चात आहे. या फोटोमध्ये तृप्ती आणि अभिनेता विकी कौशलचा रोमँटिक अंदाज प्रेक्षकांना बघायला मिळत आहे.


तृप्ती आणि विकीचा रोमँटिक अंदाज


 विकी कौशल आणि तृप्ती डिमरी  लवकरच मेरे महबूब मेरे सनम या रोमँटिक-कॉमेडी चित्रपटामध्ये स्क्रीन शेअर करणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन बंदिश बॅंडिट्स फेम दिग्दर्शक आनंद तिवारी हे करणार आहेत. गेल्या वर्षी तृप्ती आणि विकी यांनी क्रोएशियामध्ये  एक रोमँटिक गाणे शूट केले होते. या गाण्याच्या सेटवरील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोमध्ये विकी आणि तृप्तीचा रोमँटिक अंदाज प्रेक्षकांना बघायला मिळत आहे.






कधी रिलीज होणार चित्रपट?


मेरे महबूब मेरे सनम हा विकी आणि तृप्तीचा चित्रपट 2024 मध्ये फेब्रुवारी महिन्यात रिलीज होणार आहे, असं म्हटलं जात आहे. या चित्रपटामधील गाण्याचे डायरेक्शन फराह खाननं केली आहे.






अॅनिमल चित्रपटामधील तृप्ती आणि रणबीरच्या इंटिमेट सीनची सध्या सोशल मीडियावर चर्चा होत आहे. या सीनबाबत तृप्तीनं एका मुलाखतीमध्ये सांगितलं," इंटिमेट सीन जेव्हा शूट केला जात होता तेव्हा सेटवर फक्त चार-पाच लोक होते. दर पाच मिनिटांनी ते सर्व   मला विचारत होते, 'तू ठीक आहेस ना?' तुला काही हवे आहे का? तुला कम्फर्टेबल वाटत आहे का?' जेव्हा तुमच्या आजूबाजूचे लोक तुम्हाला खूप पाठिंबा देतात, तेव्हा तुम्हाला अजिबात विचित्र वाटत नाही."


तृप्तीनं 'या' चित्रपटांमध्ये केलंय काम


 2017 मध्ये प्रदर्शित झालेल्या पोस्टर बॉइज या चित्रपटामधून तृप्तीनं बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. 'बुलबुल'  या चित्रपटामधील तृप्तीच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं.  त्यानंतर तृप्तीचा कला हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला. 


संबंधित बातम्या:


Ranbir Kapoor And Tripti Dimri Intimate Scene: तृप्तीनं सांगितला 'अॅनिमल'मधील इंटिमेट सीन शूट करताना आलेला थरारक अनुभव; म्हणाली, "दर पाच मिनिटांनी..."