Fighter New Poster: 'फायटर' (Fighter) या चित्रपटाची गेल्या काही दिवसांपासून चर्चा होता आहे. हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि दीपिका पदुकोण (Deepika Padukone) यांच्या या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वी रिलीज करण्यात आला. या टीझरमधील हृतिक, अनिल कपूर आणि दीपिका यांच्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले. आता या चित्रपटाचं एक पोस्ट रिलीज करण्यात आलं आहे. या पोस्टरवर अभिनेता अक्षय ओबेरॉय (Akshay Oberoi) जबरदस्त लूकमध्ये दिसत आहे. अक्षयनं फायटर चित्रपटाचं पोस्टर शेअर करुन या चित्रपटामधील त्याच्या भूमिकेची माहिती नेटकऱ्यांना दिली आहे.
अक्षय ओबेरॉय साकारणार 'ही' भूमिका (Akshay Oberoi In Fighter)
फायटर या चित्रपटात अक्षय ओबेरॉय हा स्क्वाड्रन लीडर बशीर खान ही भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचं पोस्टर शेअर करुन अक्षयनं कॅप्शनमध्ये लिहिलं, "स्क्वाड्रन लीडर बशीर खान,कॉल साइन: बॅश,Designation: वेपन सिस्टम ऑपरेटर ,युनिट: एअर ड्रॅगन्स"
'फायटर' चित्रपटाची स्टार कास्ट (Fighter Star Cast)
'फायटर' या चित्रपटामध्ये हृतिक रोशन, दीपिका पदुकोण,करण सिंह ग्रोवर आणि अनिल कपूर हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटात हृतिक हा स्क्वाड्रन लीडर समशेर पठानिया या भूमिकेत दिसणार आहे. तर दीपिका पदुकोण ही स्क्वाड्रन लीडर मीनल राठोड उर्फ मिनी ही भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात अनिल कपूर हे कमांडिंग ऑफिसर कॅप्टन राकेश जयसिंह उर्फ रॉकी या दमदार भूमिकेत दिसणार आहे. तर करण सिंह ग्रोवर हा या चित्रपटात स्क्वाड्रन लीडर सरताज गिल ही भूमिका साकारणार आहे.
कधी रिलीज होणार फायटर? (Fighter Release Date)
फायटर हा चित्रपट 25 जानेवारी 2024 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन सिद्धार्थ आनंदनं केलं आहे. सिद्धर्थच्या 'वॉर', 'बँग बँग' या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. आता त्याच्या फायटर या चित्रपटाला देखील प्रेक्षकांची पसंती मिळणार का?याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. फायटर या चित्रपटात हृतिक आणि दीपिका पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करणार आहेत.
संबंधित बातम्या: