Anil Kapoor : बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर (Anil Kapoor) सध्या चर्चेत आहेत. नावाचा गैरवापर होत असल्याने त्यांनी कोर्टात धाव घेतली आहे. आता दिल्ली उच्च न्यायालयात याप्रकरणाची सुनावणी होणार आहे. वैयक्तिक सुरक्षिततेसाठी त्यांनी दिल्ली उच्च न्यायलयात याचिका दाखल केली आहे.


अनिल कपूर यांनी दाखल केलेल्या याचिकेत विविध संस्थांना त्यांच्या संमतीशिवाय त्यांचे नाव AK, आवाज, फोटो आणि आडनाव इत्यादी वापरण्यावर पेटंट असणार आहे. न्यायमूर्ती प्रतिभा एम सिंह (Justice Pratibha M Singh) यांच्या खंडपीठासमोर लवकरच या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.


अनिल कपूरने दाखल केलेल्या याचिकेत काय आहे? 


अनिल कपूरने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेत सोशल मीडिया साईट्स, अनेक मोठ-मोठे चॅनेल हे अनिल कपूर यांच्या नावाचा, आवाजाचा, स्वाक्षरी, प्रतिमाचा परवानगी न घेता वापर करतात. त्यामुळे या वैयक्तिक हक्कांचे उल्लंघन करण्यावर कायमस्वरूपी अभिनेत्याने मनाई हुकूम मागितला आहे. अनिल कपूरच्या संमतीशिवाय कोणत्याही व्यावसायिक किंवा वैयक्तिक फायद्यासाठी अभिनेत्याच्या फायद्याचा गैरवापर करणं अयोग्य आहे. अभिनेत्याच्या AK, लखन, मि.इंडिया, नायक आणि झकास यासारख्या गोष्टींचा वापर करण्यासाठी त्याची परवानगी घ्यावी लागणार आहे.






आवाज, नाव आणि प्रतिमा यांना संरक्षण देण्याची अनिल कपूर यांनी मागणी केली आहे. खासगी अधिकाराच्या संरक्षणासाठी त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. न्यायमूर्ती प्रतिभा एम सिंह यांच्या खंडपीठासमोर लवकरच या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. अनिल कपूर यांच्याआधी अमिताभ बच्चन यांनीदेखील खासगी अधिकाराच्या संरक्षणासाठी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. 


अनिल कपूर लवकरच भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar) आणि शहनाज गिल यांच्या आगामी सिनेमात झळकणार आहे. 'थँक्यू फॉर कमिंग' असे या सिनेमाचे नाव आहे. काही दिवसांपूर्वीच या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 6 ऑक्टोबर 2023 रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येईल. या सिनेमाची निर्मिती अनिल कपूर यांच्या लेकीने अर्थात रिया कपूरने केली आहे.


संबंधित बातम्या


Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; आवाज, नाव आणि प्रतिमा यांना संरक्षण देण्याची मागणी