Ananya Pandey : बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे अलिकडे तिच्या 'कॉल मी बे' वेब सीरिज चांगलीच चर्चेत आहे. कॉल मी बे वेब सीरिजला ॲमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. अनन्या पांडेने बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यापासून ती कधी प्रोफेशनल लाईफमुळे तर कधी पर्सनल लाईफमुळे कायमच चर्चेत असते. ती सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे. तिचा मोठा चाहतावर्ग आहे. पण, अनेकांना हे माहित नसेल की, तिला गंभीर आजार आहे.


अनन्या पांडे मानसिक आजाराने ग्रस्त


अभिनेत्री अनन्या पांडेला इंम्पोस्टर सिन्ड्रोम या गंभीर आजाराचं निदान झालं आहे. अलीकडेच अनन्याने सांगितलं की, ती गंभीर आजाराने ग्रस्त आहे. अभिनेत्री अनन्या पांडेला इम्पोस्टर सिंड्रोम नावाचा आजार आहे. हा आजार नेमका काय आहे, ते सविस्तर जाणून घ्या. अलीकडेच अभिनेत्री अनन्या पांडेने खुलासा केला आहे की, ती इम्पोस्टर सिंड्रोम या आजाराने ग्रस्त आहे. या आजारात काय होते, हेही अनन्याने सांगितलं आहे. 


अनन्या पांडे इम्पोस्टर सिंड्रोममुळे त्रस्त 


इम्पोस्टर सिंड्रोमबद्दल अनन्यानं सांगितलं की, "माझा इम्पोस्टर सिंड्रोम काही साध्या गोष्टींपासून सुरू होतो, जसे कोणी माझे नाव घेते. तेव्हा मी पूर्णपणे वेगळं व्यक्तिमत्व असते. मुलाखती आणि इतर वेळी कुणी माझं नाव घेतलं, तर मला कधीकधी असं वाटतं की, माझं नाव माझं नाही. मला एका तिसऱ्या व्यक्तीसारखे वाटतं. जेव्हा मी स्वतःला बिलबोर्डवर पाहते, तेव्हा मला असं वाटत नाही की, मी स्वत:ला पाहतेय, किवां मी माझेच चित्रपट पाहते. पडद्यावर मी स्वत:च आहे, हे मी विसरून जाते, असं तिने न्यूज 18 ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे.






90 मधील प्रसिद्ध बॉलिूवूड अभिनेता चंकी पांडे याची मुलगी अनन्या पांडे हिने 2019 मध्ये करण जोहरच्या 'स्टुडंट ऑफ द इयर 2' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. यानंतर ती पत्नी पत्नी और वो, खाली पीली, गहरियां, लायगर आणि ड्रीम गर्ल 2 सारख्या चित्रपटांमध्ये दिसली. अनन्या सध्या चित्रपट आणि वेब सीरीजमध्ये झळकत आहे. तिच्या 'कॉल मी बे' ही वेब सीरीजवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. आता ती लवकरच CTRL या चित्रपटात दिसणार आहे. CTRL चित्रपट फक्त OTT प्लॅटफॉर्म Netflix वर प्रदर्शित होणार आहे.


"मी माझ्या कामावर खूश नसते"


इम्पोस्टर सिंड्रोमबद्दल अनन्या पांडे पुढे म्हणाली, "मला सतत माझ्या आजूबाजूच्या लोकांकडून मी करत असलेल्या गोष्टींबद्दल प्रमाणीकरण हवं असतं. विशेषत: चित्रपटाच्या सेटवर, कारण मी स्वतःवर खूप कठोर असते. जरी दिग्दर्शकाला माझं काम आवडले असेल तरीही, मी माझा शॉट पाहून आनंदी होत नाही. मी माझ्या कामावर खूश नसते, असंही तिने म्हटलंय.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Bigg Boss Marathi : आज बिग बॉस मराठीच्या ग्रँड फिनाले, व्होटिंग ट्रेंड्समध्ये सूरज चव्हाण आघाडीवर; निक्की ट्रॉफीवर नाव कोरणार?