Govinda : बॉलिवुड अभिनेता गोविंदा (Govinda) याला काही दिवसांपूर्वी त्याच्याच बंदूकीतून मिसफायर होऊन गोळी लागली.या घटनेनंतर गोविंदाला मुंबईतील क्रिटीकेअर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.  त्यानंतर त्याच्या पायावर शस्रक्रिया देखील करण्यात आली आहे. आता गोविंदाला रुग्णालयातून डीस्चार्ज देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे आता त्याची प्रकृती ठीक असल्याची माहिती समोर आली आहे. 


रुग्णालयातून बाहेर आल्यानंतर गोविंदा व्हिलचेअरवर दिसला. त्याचप्रमाणे त्याने बाहेर आल्यानंतर सगळ्यांचेच आभार मानले. तसेच त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? याविषयी स्वत: अभिनेत्याने खुलासा केला आहे. त्यामुळए गोविंदाच्या पायाला गोळी नेमकी कशी लागली हे देखील गोविंदाने सांगितलं आहे. 


गोविंदाला गोळी नेमकी कशी लागली?


गोविंदाने त्या दिवशीचा घटनाक्रम सांगताना म्हटलं की, त्या दिवशी कोलकाताला एका कार्यक्रमासाठी निघालो होतो. सकाळी पावणे पाच वाजताची वेळ होती. त्याचवेळी नेमकी बंदूक माझ्या हातातून पडली आणि गोळी सुटली. सुरुवातीला मला फक्त झटका लागला. पण मी जेव्हा खाली वाकून पाहिलं तेव्हा पायातून बरंच रक्त येत होतं. त्यानंतर मी   डॉ. अग्रवाल यांच्यासह क्रिटीकेअर रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालो.










मुख्यमंत्री शिंदेंचे मानले आभार


गोविंदाने रुग्णालयातून बाहेर येऊन सर्वात आधी त्याच्यासाठी प्रार्थना केलेल्या सर्वांचे आभार मानले. यावेळी गोविंदाने म्हटलं की, मी लवकर बरा व्हावा यासाठी अनेकांनी प्रार्थना केली,मला आशीर्वादही दिले, त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही माझी विचारपूस केली, त्यांचेही मी आभार व्यक्त करत आहे.    






ही बातमी वाचा : 


Alpha Release Date : 'अल्फा' चित्रपटाची रिलीज डेट समोर, आलिया भट आणि शर्वरीही स्पाय एजंटच्या भूमिकेत