मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचे धाकटे चिरंजीव अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चंट (Radhika Merchant) यांचा बहुप्रतिक्षित विवाहसोहळ्याचा दिवस आज अखेर उजाडला आहे. आज 12 जुलै रोजी अनंत आणि राधिका सात जन्माच्या गाठी बांधतील. या लग्नसोहळ्याची गेल्या अनेक दिवसांपासून खूप चर्चा रंगली होती. आज हा शाही विवाहसोहळा मुंबईत पार पडत आहे. या लग्नसोहळ्याची बॉलिवूडमधील कलाकाराची हजेरी पाहायला मिळत आहे. यासोबतच विदेशातील दिग्गज कलाकार मंडळीही या सोहळ्यासाठी पोहोचले आहेत.


WWE सुपरस्टारचा ट्रेडिशनल अंदाज


अमेरिकन अभिनेता आणि WWE सुपरस्टार प्रसिद्ध कुस्तीपटू जॉन सीना (WWE Superstar John Cena) अनंत-राधिकाच्या लग्नासाठी पोहोचला आहे. जॉन सीना अनंत राधिकाच्या लग्नस्थळी दाखल झाला आहे. यावेळी जॉन सीना ट्रेडिशनल अंदाजात दिसला. अनंत-राधिकाच्या लग्नात जॉन सीनाने रेड कार्पेटवर एन्ट्री करत कॅमेऱ्यासमोर पोझ दिल्या. यावेळी जॉन सीना आकाशी रंगाची शेरवानी आणि व्हाईट पँट अशा भारतीय ट्रेडिशनल अंदाजात दिसला.


जॉन सीना पारंपारिक भारतीय पोशाखात






शेरवानी अन् फेटा जॉन सीनाच्या लूकनं वेधलं लक्ष


WWE सुपरस्टारला मुंबईत पाहून चाहते चांगलेच खूश झाले आहेत. जॉन सीना बीकेसी येथील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्न समारंभाला पोहोचला आहे. WWE सुपरस्टारला पारंपारिक भारतीय पोषाखात पाहण्याची अनेकांची इच्छा आज पूर्ण झाली आहे. याशिवाय लग्नात जॉन सीना फेटा बांधलेलाही दिसत आहे. याचा व्हिडीओ समोर आला आहे. 


पाहा व्हिडीओ : 






 


16 वेळा वर्ल्ड चॅम्पियन डब्ल्यूडब्ल्यूई सुपरस्टार जॉन सिना अनंत अंबानी आणि राधिकाच्या लग्नात खास पाहुणा म्हणून मुंबईत पोहोचला आहे. दरम्यान, आज सकाळीच जॉन सीना मुंबईत दाखल झाला. विमानतळावरून बाहेर पडताना आणि त्याच्या कारमध्ये प्रवेश करताना जॉन सीनाचे फोटो समोर आले आहेत. यावेळी विमानतळाबाहेर येताच त्याने फॅन्सना हात दाखवला, ज्यामुळे चाहत्यांच्या उत्साहात आणखी भर पडली.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Anant-Radhika Wedding : अनंत, आकाश की ईशा, अंबानी कुटुंबातील कुणाच्या लग्नात सर्वाधिक खर्च?