Anant-Radhika Wedding : अनंत, आकाश की ईशा, अंबानी कुटुंबातील कुणाच्या लग्नात सर्वाधिक खर्च?
सध्या अंबानी कुटुंब अनंत-राधिकाच्या लग्नसराईमध्ये व्यस्त असल्याचं दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून या दोघांच्या लग्नाची चर्चा होती. अखेर हा लग्नसोहळा आज पार पडणार आहे. हा लग्नसोहळा अत्यंत राजेशाही थाटात पार पडत असल्याचं दिसत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुकेश अंबानी यांचा मोठा मुलगा आकाश अंबानी आणि मुलगी ईशा अंबानी यांच्या लग्नसोहळ्यातही अंबानी कुटुंबाने मोठा खर्च केल होता.
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग सोहळ्यांसाठी 1260 कोटी रुपये खर्च आल्याची माहिती आहे.
मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी आणि आनंद पिरामल यांच्या लग्नात सुमारे 800 कोटी रुपये खर्च झाला होता.
ईशा अंबानी आणि आनंद पिरामल यांचं लग्न 2018 मध्ये पार पडलं. हा त्यावेळचा सर्वात शाही आणि महागडा विवाहसोहळा ठरला होता.
ईशा अंबानीच्या लग्नात बेयॉन्सेने परफॉमन्स केला होता. त्यासाठी तिला 33 कोटी रुपये मानधन देण्यात आलं होतं.
ईशा अंबानीच्या लग्नपत्रिकेची किंमत 3 लाख रुपये होती.
ईशा अंबानीने तिच्या लग्नात 90 कोटी रुपयांचा लेहंगा परिधान केला होता.
ईशा अंबानीची लग्नसोहळाही फार आलिशान पद्धतीने पार पडला होता.
आकाश अंबानी आणि श्लोका यांची प्री-इंगेजमेंट सेरेमनी गोव्यातील फाईव्ह स्टार रेसॉर्टमध्ये झाली होती. यांचं लग्न 2019 मध्ये झालं.
नीता अंबानीने सून श्लोकाला मोवाड एल इन्क्मंपेरेबल हार दिला होता, ज्याची किंमत 451 कोटी रुपये होती.
आकाश अंबानी आणि श्लोका यांच्या लग्नात नेमका किती खर्च आला, याबाबत अधिकृत माहिती नाही. मात्र, हा लग्नसोहळाही फारच लक्झरी होता.