Amy Jackson Ed Westwick Wedding : अभिनेत्री एमी जॅक्सनने बॉयफ्रेंड एड वेस्टविकसोबत लग्नगाठ बांधली आहे. एमी जॅक्सनने इटलीमध्ये गुपचूप लग्न उरकलं आहे. अभिनेत्री एमी जॅक्सन 23 ऑगस्ट रोजी प्रियकर एड वेस्टविकसोबत लग्नबंधनात अडकली आहे. दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. या कपलच्या लिप लॉक करतानाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.


बॉयफ्रेंडसोबत लिव्ह एनमध्ये असलेल्या अभिनेत्रीने गुपचूप उरकलं लग्न


बॉलिवूड अभिनेत्री एमी जॅक्सनने तिचा दीर्घकाळाचा प्रियकर एड वेस्टविकसोबत लग्न केलं आहे. इटलीमध्ये कुटुंब आणि मोजक्या पाहुण्याच्या उपस्थितीत दोघांचा लग्नसोहळा पार पडला. हा लग्नसोहळा ख्रिश्चन पद्धतीने पार पडला, ज्याचे अनेक सुंदर फोटो या जोडप्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. लग्नानंतर दोघे लिप लॉक करताना दिसले. एमी जॅक्सनने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये एमी आणि एडच्या चेहऱ्यावरील आनंद स्पष्ट दिसत आहे.






लिप लॉक करतानाचे फोटो व्हायरल


या फोटोमध्ये एमी आणि एड वेस्टविक कधी मिरर सेल्फी घेताना लिप लॉक करताना दिसत आहे. एमी जॅक्सन आणि एडने त्यांच्या कुटुंबीयांसह आणि खास मित्रांसोबत फोटोंही शेअर केले आहेत. दोघांच्याही चेहऱ्यावर लग्नाचा आनंद स्पष्ट दिसत होता. लग्नामध्ये एमी जॅक्सन व्हाईट एम्ब्रॉयडरी ब्रायडल गाऊन परिधान केल्याचं दिसत आहे, यासोबतच तिने मॅचिंह व्हाईट फ्लोरल हेअरबँडली लावला आहे. या संपूर्ण लूकमध्ये ती फारच सुंदर दिसत आहे.






इंस्टाग्रामवर शेअर केले फोटो 


लग्नाचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर करताना एमीने एक खास कॅप्शन देत लिहिलं आहे, 'चला लग्न करु, बेबी' एमी आणि एड प्रायव्हेट जेटने लग्नासाठी इटलीला पोहोचले. या जोडप्याने प्रायव्हेट जेटमधील फोटोही शेअर केले आहेत. यातील एका फोटोमध्ये एमी आणि एड किस करताना दिसले. या दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना खूप आवडली असून त्यांनी कपलला लग्नासाठी शुभेच्छाही दिल्या आहेत.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Bigg Boss Marathi : 'रितेश भाऊ जान्हवी आणि निक्कीला त्यांची लायकी दाखवा', भाऊच्या धक्क्याकडून प्रेक्षकांना अपेक्षा; आज कुणाची बत्ती गुल होणार?