मुंबई : नवाब मलिकांनी जयदीप राणा या ड्रग्ज पेडलरचा संबंध देवेंद्र फडणवीसांशी संबंध असल्याचा आरोप केला. त्यानंतर आता अमृता फडणवीसांनी (Amruta Fadnavis) पत्रकार परिषद घेऊन नवाब मलिकांनी केलेले आरोप खोडून काढत कुणी अंगावर आलं तर सोडणार नाही असा इशारा नवाब मलिकांना दिलाय. तर मर्द असाल तर तुम्ही फडणवीसांना टार्गेट करा माझ्यावर कसले आरोप करता माझा आणि राजकारणाचा काहीही संबंध नाही असं देखील अमृता फडणवीस म्हणाल्यात.


अमृता फडणवीस म्हणाल्या, मी राजकारणी नाही, समाजसेविका आहे. मुंबईत  रिव्हर मार्च संस्थेने माझ्याशी त्यावेळी संपर्क साधला आणि  नद्या पुनरुज्जीवित करण्यासाठी विनंती केली त्यानंतर मी त्यांना सहकार्य केले आहे. रिव्हर मार्च ही पब्लिक चळवळ आहे. नद्यांचे संवर्धन करण्यासाठी मी या चळवळीत सहभागी झाले. 



25 वर्ष शिवसेनेची सत्ता आहे पण त्यांनी नद्यासाठी काही केलं नाही. आमच्या चळवळीनंतर मात्र आता  यंत्रणा जाग्या झाल्या आहेत. जनजागृती करण्यासाठी आम्ही सद्गुरू जग्गी  यांच्या सोबत कार्यक्रम केला. सचिन गुप्ता आणि जयदीप राणा यांनी गाणं तयार केलं. तर सचिन गुप्ता यांनी या गाण्याच्या दिग्दर्शनलाला मदत केली. हे गाणं विनामूल्य तयार करण्यात आले आहे. तुम्ही बिघडे नवाब आहात अशी टीका अमृता फडणवीस यांनी केली आहे. माझ्यावर जे आरोप चुकीचे आहेत, असे देखील अमृता फडणवीस यांनी टीका केली. 


देवेंद्र फडणवीसांच्या इशाऱ्यावरुन राज्यात ड्रग्जचा खेळ सुरु आहे, असा गंभीर आरोप नवाब मलिकांनी केला आहे. देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री असताना अमृता फडणवीसांनी नदी संरक्षणासाठी गाणं गायलं होते. यामध्ये देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार यांनी अभिनय केला होता. डायरेक्टर सचिन गुप्ता होते. ते गाणं अभिजीत जोशी यांनी लिहिलेले होते. त्याचे फायनान्स हेड ड्रग्स पेडलर जयदीप राणा होता. जयदीप राणा यांच्यासोबत फडणवीसांचा काय संबंध आहे? याची चौकशी व्हायला पाहिजे, असं मलिक म्हणाले होते. देवेंद्र फडणवीसांच्या आशीर्वादाने महाराष्ट्रात ड्रग्सचे धंदे चालतात. जयदीप राणा हे फडणवीसांच्या घरच्या कार्यक्रमात उपस्थित राहतात. ड्रग्स रॅकेटला फडणवीस संरक्षण देतात, असा गंभीर आरोप मलिक यांनी यावेळी केला होता.