मुंबई : देशभरात कोरोना संसर्गाची दुसरी लाट असताना बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी देखील कोरोनाबाधितांना मदतीचा हात दिला आहे. त्यांनी कोरोनाबाधित रुग्णांसाठी दोन कोटी रुपयांची मदत केली आहे.


अमिताभ बच्चन यांनी दिल्लीतील रकाब गंज गुरुद्वारामध्ये कोविड केअर सेंटर बनवण्यासाठी दोन कोटी रुपयांची मदत केली आहे. 300 बेड्स असलेल्या या कोविड सेंटरचं नावं 'श्री गुरु तेग बहादुर कोविड केअर फॅसिलिटी' असं ठेवण्यात आलं आहे.


या कोविड केअर फॅसिलिटीमध्ये कोरोनाबाधित रुग्णांसाठी डॉक्टर, पॅरामेडिक्स यांच्यासह अॅम्ब्युलन्स, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स इत्यादी सुविधांची व्यवस्था असेल. कोरोनाबाधितांसाठी हे कोविड सेंटर आजपासून खुलं करण्यात येईल. या कोविड सेंटरमध्ये कोरोनाच्या रुग्णांसाठी सर्व सोयीसुविधान मोफत असली.


मनजिंदर सिंह सिरसा यांनी कोविड केअर सेंटरच्या निर्माणात अमिताभ बच्चन यांच्या योगदानाचं कौतुक करताना सोशल मीडियावर लिहिलं आहे की, "जब दिल्लीमध्ये दररोज ऑक्सिजनचा तुटवडा होता, तेव्हा अमिताभ बच्चन जवळपास रोजच मला कॉल करुन या कोविड सेंटरच्या कामाविषयी माहिती घेत होते."


त्याआधी त्यांनी लिहिलं आहे की, "श्री गुरु तेग बहादुर कोविड केअर फॅसिलिटीच्या निर्माणसाठी मदत देताना अमिताभ यांचे हे शब्द होते - शिखांच्या सेवेला सलाम".


कोविड सेंटरच्या निर्माणात योगदानाबाबत एबीपीने अमिताभ बच्चन यांची प्रतिक्रिया जाणण्यासाठी त्यांच्याशी संपर्क केला होता. परंतु त्यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया मिळू शकली नाही.


अकाली दलाचे नेते मनजिंदर सिंह सिरसा यांनी नुकतंच सोशल मीडियाद्वारे माहिती दिली होती की, निर्माता-दिग्दर्शक रोहित शेट्टी यांनीही या कोविड सेंटरच्या निर्माणासाठी आर्थिक मदत केली होती.  मात्र रोहित शेट्टी यांचं कौतुक करताना त्याने किती रक्कम दिली याचा उल्लेख केला नव्हता.