एक्स्प्लोर
‘सावधान इंडिया’चं सूत्रसंचालन बिग बी करणार

मुंबई : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध क्राईम शो ‘सावधान इंडिया’च्या दोन एपिसोड्सचं सूत्रसंचालन हिंदी सिनेसृष्टीचे महानायक अमिताभ बच्चन करणार आहेत. अमिताभ बच्चन आपल्या आगामी ‘पिंक’ सिनेमाच्या प्रमोशनसाठी ‘सावधान इंडिया’चं सूत्रसंचालन करणार आहेत. अमिताभ बच्चन यांचा आगामी ‘पिंक’ सिनेमा सत्य घटनांवर आधारित असून, महिला सशक्तीकरण हा विषय या सिनेमातून मांडण्यात आला आहे. ‘सावधान इंडिया’तूनही सत्य घटनांवर आधारित एपिसोड्स केले जातात. एका गुन्ह्यात फसलेल्या तीन मुलींवर आधारित ‘पिंक’ सिनेमा आहे आणि त्यामुळेच अमिताभ बच्चन हे ‘सावधान इंडिया’मध्ये सिनेमाच्या प्रमोशनसाठी येणार आहेत. अमिताभ बच्चन यांनी सूत्रसंचालन केलेले दोन्ही एपिसोड पुढील महिन्यात प्रसिद्ध होणार आहे.
Before You Go
Arjun Tendulkar Weds Saaniya Chandhok : अर्जुन-सानिया लग्नबंधनात ! स्टायलिश लूकने वेधलं लक्ष






















