Amitabh Bachchan Slapped Rekha : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि रेखा (Rekha) यांची प्रेम कहानी अधुरी राहिली आहे. एकेकाळी बॉलिवूडनगरीत त्यांच्या अफेअरची चांगलीच चर्चा व्हायची. आज अमिताभ आणि जया बच्चन (Jaya Bachchan) यांचा सुखी संसार सुरू आहे. तर दुसरीकडे रेखाने अजुनही लग्न केलेलं नाही. रेखा आणि अमिताभ या जोडीचा मोठा चाहतावर्ग असून त्यांनी लग्न करावं असं त्यांना वाटत होतं. त्यांचं लग्न न झाल्याने चाहते मात्र नाराज झाले. अमिताभ आणि रेखा यांच्या अफेअरच्या चर्चा 80 च्या दशकात खूपच सुरू होत्या. आजही चाहत्यांना ही जोडी आवडते. पण एकदा बिग बींनी रेखा यांच्या कानशीलात लगावली होती. 


अमिताभ आणि रेखा यांच्या अफेअरच्या चर्चा 80 च्या दशकात जोरात सुरू होत्या. पण त्यांचं नातं पुढे गेलं नाही. आज दोघेही वेगवेगळ्या पद्धतीचं आयुष्य जगत आहेत. पण खूप कमी लोकांना माहिती आहे की 'लावारिस' या चित्रपटाच्या सेटवर अमिताभ यांनी रेखा यांच्या एकदा नव्हे तर अनेकदा कानशीलात लगावली होती. 


रेखाला आलेला अमिताभचा राग


अमिताभ बच्चन 'लावारिस' चित्रपटाचं शूटिंग करत होते. शूटिंगदरम्यान ते ईरानी डान्सरच्या प्रेमात पडल्याचं वृत्त समोर आलं होतं. त्यामुळे रेखा यांचा राग अनावर झाला. अमिताभने त्यांना फसवलं असं त्यांना वाटलं. अमिताभ यांना जाब विचारण्यासाठी रेखा 'लावारिस' चित्रपटाच्या सेटवर गेल्या. त्यांचा वाद खूपच वाढला आणि अमिताभ बच्चन यांनी रेखा यांच्या कानशीलात लगावली. त्यांनी एक-दोन नव्हे तर अनेकदा सर्वांसमोर तिच्या कानाखाली वाजवली असं म्हटलं जातं. रेखा यांना मोठा धक्का बसला होता.


अमिताभ बच्चन यांच्या या कृतीने रेखा हैराण झाल्या होत्या. प्रचंड दु:खी झालेल्या रेखा यांनी एक निर्णय घेतला. रेखा यांनी अमिताभसोबत 'सिलसिला' हा चित्रपट करण्याचं नाकारलं. रेखाच्या या निर्णयामुळे यश चोप्रा मात्र हैराण झाले होते. त्यांनी रेखा यांना समजावल्यानंतर त्यांनी हा चित्रपट करण्याचं ठरवलं. 'सिलसिला' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर मात्र फ्लॉप ठरला होता. 


अमिताभ-रेखा यांची एक अधुरी प्रेमकहाणी (Amitabh Bachchan - Rekha Love Story)


अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्या लव्हस्टोरीची सुरुवात 'दो अंजाने' या चित्रपटाच्या सेटवर झाली आहे. 'दो अंजाने' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान रेखा आणि अमिताभ बच्चन एकमेकांच्या प्रेमात पडले होते. पण आपल्या अफेअरचा परिणाम आपल्या कुटुंबावर होईल असं अमिताभला वाटलं आणि त्यांनी रेखासोबतच्या नात्याला पूर्णविराम दिला. अशाप्रकारे अमिताभ आणि रेखा यांच्या लव्हस्टोरीचा दी एन्ड झाला. 


संबंधित बातम्या


Amitabh Bachchan : बिग बींचा सेटवरच दिग्दर्शकासोबत जोरदार वाद, अन् रात्री फोन करून म्हणाले...