Monday Motivation Munna Bhaiya Motivational Story : बॉलिवूडमध्ये (Bollywood) अनेक चित्रपट प्रदर्शित होत असतात. गेल्या 10 वर्षात तुमचं कॉलेज संपलं असेल किंवा तुम्ही महाविद्यालयीन विद्यार्थी असाल तर तुम्ही 'प्यार का पंचनामा' हा चित्रपट नक्कीच पाहिला असले. 2011 साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट तरुणांच्या पसंतीस उतरला. काहीही प्रमोशन न केलेला आणि बडे सेलिब्रिटी नसलेल्या या चित्रपटाची निर्मिती 3 कोटींमध्ये करण्यात आली होती. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने 9 कोटींची कमाई केली. बजेटपेक्षा जास्त कमाई केली असली तरी हा चित्रपट जास्त लोकांपर्यंत पोहोचला नव्हता. या चित्रपटाने एका अभिनेत्याला मात्र लोकप्रियता मिळवून देण्याचं काम केलं. अभिनेता दररोज 32 रुपयांची बचत करुन आपलं पोट भरत असे. अभिनेत्याची स्ट्रगल स्टोरी खूपच प्रेरणादायी आहे. 


'प्यार का पंचनामा' या चित्रपटात अभिनेता दिव्येंदु शर्माने (Divyendu Sharma) 'लिक्विड' हे पात्र साकारलं होतं. या चित्रपटाने स्टारडम नसलेल्या दिव्येंदुला रातोरात सुपरस्टार केलं. या चित्रपटानंतर पुन्हा एकदा 'मुन्ना भैय्या' या पात्राने त्याला चांगलीच लोकप्रियता मिळाली. 


दिव्येंदु शर्माचा शालेय प्रवास... 


दिव्येंदु शर्माला दहावीत 45% मिळाले होते. दिव्येंदु अभ्यासात खूपच सर्वसाधारण विद्यार्थी होता. अभ्यासात हुशार नसल्याने त्याने कला शाखेतून शिक्षण पूर्ण केलं. आर्ट्समध्ये त्याला 84% मिळाले. दहावीपेक्षा बारावीत जास्त टक्के मिळाल्यामुळे दिव्येंदुच्या वडिलांना वाटलं की त्याने खोटी मार्कशीट बनवली आहे. त्यानंतर पुढे दिल्लीतील किरोडीमल महाविद्यालयातून त्याने राज्यशास्त्रात पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं.


गेल्या अनेक दशकांपासून छोट्या खेड्यापाड्यांतून अनेक मंडळी इंडस्ट्रीत स्वत:ला सिद्ध करण्यासाठी मायानगरीत येत आहेत. पण मुन्ना भैय्याने मात्र असं काहीही केलेलं नाही. अभिनयाची गोडी असल्याने त्याने मुंबईत न गाठता पुणं गाठलं. पुण्यातील एफटीआयआयमधून त्याने अभिनयाचं शिक्षण घेतलं. स्वप्न साकार करण्यासाठी मेहनत करण्याची दिव्येंदूची तयारी होती. पुण्यात येण्याआधी दिल्लीत असतानाच त्याने रंगभूमीवर पदार्पण केलं होतं. पण 2006 मध्ये पुण्यात आल्यानंतर तो कलाकार म्हणून नावारुपाला आला. 


32 रुपयांची बचत करुन पोट भरलेला दिव्येंदु


दिव्येंदुने 2007 मध्ये माधुरी दीक्षितच्या 'आजा नच ले' या चित्रपटात झळकला. पण त्याच्याकडे प्रेक्षकांचं फारसं लक्ष गेलं नाही. चांगल्या संधीच्या शोधात असणाऱ्या दिव्येंदुला 2011 मध्ये 'प्यार का पंचनामा' हा चित्रपट मिळाला. या चित्रपटातील त्याचे डॉयलॉग्सदेखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले. या चित्रपटाआधी पोट भरण्यासाठी तो दररोज 32 रुपयांची बचत करत असे. ईटाइम्सला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्याने स्वत: याबद्दल चाहत्यांना माहिती दिली आहे. 


दिव्येंदुचा 2013 मध्ये 'चश्मे बद्दूर' हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात त्याने साकारलेल्या ओमी या पात्रावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं. त्यानंतर खऱ्या अर्थाने त्याची गाडी रुळावर आली. 'इक्कीस तोपों की सलामी','दिल्ली वाली जालिम गर्लफ्रेंड','टॉयलेट एक प्रेमकथा','बत्ती गुल मीटर चालू'सारख्या अनेक चित्रपटांत तो झळकला. पण बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात हे चित्रपट कमी पडले.


...अन् मुन्ना भाई रातोरात सुपरस्टार झाला


पंकज त्रिपाठी, अली फजल आणि विक्रांत मेस्सी यांच्या 'मिर्जापूर' (Mirzapur) या सीरिजमधील मुन्ना भैय्यादेखील (Munna Bhaiya) प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरला. या वेबसीरिजमुळे दिव्येंदुचा ओटीटी विश्वात दबदबा निर्माण झाला. नुकताच त्याचा 'मडगांव एक्सप्रेस' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हातात टॅलेंट आणि पैसे असूनही चांगल काम मिळत नसल्याने दिव्येंदुला स्ट्रगल करावा लागला आहे. निराश न होता तो काम करत राहिला आहे. त्याची ही मोटिव्हेशनल स्टोरी मसालेदार आहे.


संबंधित बातम्या


Mirzapur-3 Season Updates : "बहुत तकलीफ होती है...."मिर्झापूर-3' रिलीजपूर्वी मुन्ना भैय्याने दिला चाहत्यांना धक्का!