Amitabh Bachchan Rekha Love Story : बॉलिवूडची सदाबहार अभिनेत्री रेखा तिचं सौंदर्य, अभिनयासह तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही काय चर्चेत राहिली आहे. अमिताभ बच्चन आणि रेखाची लव्ह लाईफ नेहमीच चर्चेत राहिली. अमिताभ बच्चन आणि रेखा यांची प्रेमकहाणी अनेक दशकांपूर्वी संपली आहे. पण, आजही त्यांची अधुरी प्रेम कहाणी चर्चेत असते. अमिताभ बच्चन आणि रेखा यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं होतं, त्यादरम्यान दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले होते.
जेव्हा अमिताभ बच्चन यांना भेटायला गुपचूप पोहोचली रेखा
रेखाने नेहमीच आपले प्रेम उघडपणे व्यक्त केलं, मात्र अमिताभ बच्चन यांनी नेहमीच मौन बाळगलं. याचं एक कारण म्हणजे रेखा आणि अमिताभ यांची लव्ह स्टोरी सुरु असताना त्यांचं जयासोबत लग्न झालेलं होतं. अमिताभ आणि जयाचं लग्न आधीच झालं होतं, त्यानंतर ते रेखाच्या प्रेमात पडले. अमिताभ आणि रेखा जेव्हा एकमेकांना डेट करत होते त्या काळात अनेक किस्से आजही चर्चेत आहेत. एकदा जयाने रेखा आणि अमिताभ बच्चन यांना भेटण्यास बंदी घातली होती आणि रेखा गुपचूप बिग बींना भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये गेली होती.
अमिताभ-रेखावर यांच्या भेटण्यावर बंदी
अमिताभ आणि रेखा यांच्या लव्ह स्टोरीबद्दल समजताच जयाने त्या दोघांच्या भेटण्यावर बंदी घातली होती. अमिताभ बच्चन यांनी जया बच्चन यांचं ऐकलं आणि रेखापासून दूर जाऊ लागले. 'सिलसिला' चित्रपटानंतर त्यांनी रेखासोबत कोणत्याही चित्रपटात काम केले नाही. त्यानंतर 1983 मध्ये 'कुली' चित्रपटाच्या सेटवर अमिताभ बच्चन यांच्यासोबत अपघात झाला. कुलीच्या सेटवर अमिताभ यांना गंभीर दुखापत झाली, ज्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तेव्हा त्यांची प्रकृती खूपच गंभीर होती. मीडिया रिपोर्टनुसार, अमिताभ यांच्या प्रकृतीबद्दल रेखाला फार चिंता वाटत होती, यामुळे ती त्यांना भेटण्यासाठी रुग्णालयात पोहोचली. मात्र, जया यांनी रेखाना अमिताभ बच्चन यांना भेटू दिलं नाही.
अमिताभ यांची अवस्था पाहून रेखाला धक्काच बसला
त्यावेळी अमिताभ बच्चन यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आलं. देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधीही त्यांना भेटण्यासाठी रुग्णालयात पोहोचल्या होत्या. अशा स्थितीत रेखा स्वत:ला थांबवू शकली नाही. एक दिवस उजाडण्यापूर्वी रात्रीच्या अंधारात रेखा अमिताभ बच्चन यांना पाहण्यासाठी साधी साडी नेसून अंधारात हॉस्पिटलमध्ये पोहोचली. यावेळी अमिताभ यांची अवस्था पाहून रेखाला खूप वाईट वाटलं आणि रुग्णालयातून परतल्यानंतर तिने मंदिरात त्यांच्यासाठी प्रार्थना, पूजा-पाठ करण्यास सुरुवात केली.
महत्त्वाच्या इतर बातम्या :