Amitabh Bachchan Birthday Special : बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांचा आज वाढदिवस आहे. अमिताभ बच्चन यांचा जन्म 11 ऑक्टोबर 1942 रोजी झाला. अमिताभ बच्चन आज त्यांचा 82 वा वाढदिवस साजरा करत आहेत. ते अभिनेता बनण्यासाठी कोलकाताहून मुंबईत आले होते. अमिताभ  यांनी आपल्या दमदार अभिनयाने लोकांच्या हृदयात स्थान निर्माण केलं आहे. अमिताभ बच्चन यांच्या प्रोफेशनल लाइफप्रमाणेच त्यांची पर्सनल लाइफही तितकीच चर्चेत राहिली. अमिताभ बच्चन आणि रेखा यांची लव्ह स्टोरी 70 च्या दशकातील चर्चित प्रेम कहाणींपैकी एक होती, जी पूर्ण होऊ शकली नाही. 


70 च्या दशकातील अधुरी प्रेमकहाणी


बॉलिवूडचा शहेनशाह अमिताभ बच्चन यांनी अनेक चित्रपटांतून आपल्या दमदार अभिनयाने चाहत्यांची मने जिंकली आहेत. आजही ते अनेक चित्रपटांतून आणि टीव्ही शोमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत आहेत. सध्या अमिताभ आणि रजनीकांत यांचा वेट्टीयान चित्रपट बॉक्स ऑफिसवर धमाका करताना दिसत आहे. अमिताभ बच्चन यांनी आतापर्यंत अनेक प्रसिद्ध अभिनेत्रींसोबत काम केलं आहे, पण अमिताभ बच्चन आणि रेखा यांची ऑनस्क्रीन जोडी प्रेक्षकांच्या खास पसंतीस उतरली. याचं एक कारण म्हणजे दोघांच्या प्रेम कहाणीची चर्चा आहे.


अमिताभ आणि रेखाची प्रेमकहाणी कधी सुरू झाली?


अमिताभ आणि रेखा यांची ऑनस्क्रीन जोडी 70 च्या दशकातील चर्चित जोडी होती. त्यांनी 10 चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. मीडिया रिपोर्टनुसार, अमिताभ बच्चन आणि रेखा यांची प्रेमकहाणी 1976 साली 'दो अंजाने' चित्रपटाच्या सेटवर सुरु झाली. गंगा की सौगंधच्या सेटवर दोघांमधील केमिस्ट्री पाहून लोकांना यांच्यातील प्रेमाची चाहूल लागली होती. शूटिंगदरम्यान एका सहकलाकाराने रेखासोबत गैरवर्तन केलं होते, त्या सहकलाकारावर अमिताभ बच्चन चांगलेच भडकले होते.


कसं आणि कुठे फुललं दोघांचं प्रेम?


'दो अंजाने' चित्रपटाच्या सेटवर अमिताभ आणि रेखा यांचं प्रेम फुललं. या दोघांची ऑनस्क्रीन जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस पडत होती. त्यामुळे निर्माते या जोडीला कास्ट करत होते. या दोघांनी 10 चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. मात्र, रेखा आणि अमिताभ यांची लव्ह स्टोरी सुरु होण्याआधीच अमिताभ यांचं जयासोबत लग्न झालेलं होतं. त्यामुळे त्यांची लव्ह स्टोरी अपूर्ण राहिली.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Amitabh Bachchan Birthday : ना पैसे, ना घर... मरीन ड्राईव्हवरील बाकावर उंदरांसोबत काढली रात्र, आज महानायक आहे 1600 कोटींचा मालक