एक्स्प्लोर

अमरसिंहांचा गौप्यस्फोट, अमिताभ-जया वेगवेगळे राहतात!

लखनऊ: महानायक अमिताभ बच्चन आणि जया बच्चन हे गेल्या कित्येक वर्षांपासून स्वतंत्र राहात असल्याच्या गौप्यस्फोट समाजवादी पक्षाचे बडतर्फ नेते अमर सिंह यांनी केला आहे. ते वाराणसीमध्ये पत्रकारांशी बोलत होते. उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्ष फुटण्याला अमर सिंह जबाबदार असल्याचं मानलं जात आहे. त्याबाबत अमर सिंह यांनी आपली भूमिका मांडली. कोणत्याही भांडणाचा संबंध माझ्याशीच का जोडता? अमिताभ बच्चन आणि जया बच्चन हे गेल्या अनेक वर्षांपासून वेगवेगळे राहतात, त्याच्याशीही माझा संबंध जोडता का, असं म्हणत समाजवादी पक्षाचे बडतर्फ नेते अमर सिंह यांनी बच्चन पती-पत्नीच्या नात्याबाबत गौप्यस्फोट केला. आपली आणि बच्चन परिवाराची ओळख होण्याआधीपासूनच एकजण प्रतीक्षा बंगल्यात तर दुसरा जनक बंगल्यात वास्तव्यास असल्याची माहितीही अमर सिंह यांनी दिली. समाजवादी पक्षात पडलेल्या पिता-पुत्राच्या फुटीला अमरसिंह जबाबदार असल्याचा ठपका सध्या ठेवला जात आहे. त्याच आरोपांना फेटाळताना बच्चन परिवारातही आपणच फूट पाडल्याचे वृत्तही निराधार असल्याचा दावा अमर सिंह यांनी केला. त्यामुळे बच्चन परिवाराशी एकेकाळी सलगी असलेल्या अमर सिंह यांनी बच्चन परिवारात सारं काही आलबेल नसल्याचं सांगून खळबळ उडवून दिली आहे. अमर सिंह काय म्हणाले? "मीडियाच्या मते, मीच अंबानी कुटुंबात भांडण लावलं. मात्र अंबानी कुटुंबातील राडा हा पैशाच्या कारणावरुन झाला.  जिथे जिथे वाद आहे, तिथे तिथे अमर सिंहचं नाव जोडलं जातं. ऐश्वर्या बच्चन आणि जया बच्चन यांनाही मीच वेगळं केलं, असा आरोप मीडियाने माझ्यावर ठेवला. मी अमिताभ बच्चन यांना ओळखतही नव्हतो, तेव्हापासून अमिताभ बच्चन आणि जया बच्चन हे वेगवेगळ्या घरात राहात होते. प्रतीक्षा आणि जनक या वेगवेगळ्या बंगल्यात दोघे राहात होते. जेव्हा मी अमिताभ बच्चन यांना ओळखतही नव्हतो, तेव्हापासून ते वेगवेगळे राहतात. मात्र मीडियाने ते माझ्याच नावे ठोकून दिलं. धीरुभाई अंबानींची संपत्ती मला मिळणार नाही. मात्र मीच त्यांच्या कुटुंबात महाभारत घडवून आणल्याचं दाखवलं जात आहे. बच्चन कुटुंबात, समाजवादी पक्षात सगळीकडे मीच भांडणं लावली, असं मीडियाचं म्हणणं आहे", असं अमर सिंह म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

Shraddha Kapoors Eetha: 'ईठा'बाबत मोठी अपडेट! श्रद्धा कपूरसोबत स्क्रीन शेअर करणार 'ही' भोजपुरी अभिनेत्री; भूमिकेबाबत सस्पेन्स कायम
'ईठा'बाबत मोठी अपडेट! श्रद्धा कपूरसोबत स्क्रीन शेअर करणार 'ही' भोजपुरी अभिनेत्री; भूमिकेबाबत सस्पेन्स कायम
Hemant Dhome on Mumbai-Pune Missing Link: पहिल्याच पावसात मिसिंग लिंकचा स्लॅब कोसळला; प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची सणसणीत पोस्ट, 4 शब्दांत भरपूर बोलला
पहिल्याच पावसात मिसिंग लिंकचा स्लॅब कोसळला; प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची सणसणीत पोस्ट, 4 शब्दांत भरपूर बोलला
Aamir Khans Silver Anklet: गौरीच्या भांगेत ना कुंकू, ना गळ्यात मंगळसूत्र; नववधुचा साधा नववधू लूक; पण आमिर खानच्या पायात पैंजण तर नाही ना?
गौरीच्या भांगेत ना कुंकू, ना गळ्यात मंगळसूत्र; नववधुचा साधा नववधू लूक; पण आमिर खानच्या पायात पैंजण तर नाही ना?
Dil Se Chaiyya Chaiyya: 'छैया छैया'साठी मराठमोळ्या अभिनेत्रीची होती पहिली पसंती, पण वजन....; नेमका किस्सा काय? प्रसिद्ध अभिनेत्री म्हणाली...
'छैया छैया'साठी मराठमोळ्या अभिनेत्रीची होती पहिली पसंती, पण वजन....; नेमका किस्सा काय? प्रसिद्ध अभिनेत्री म्हणाली...

व्हिडीओ

Missing Link Landslide | उद्घाटनानंतरच दरड; मिसिंगलिंकवरुन राजकारण | ABP Majha Special Report
Amit Thackeray on Operation Tiger : ऑपरेशन टायगर... लाजा नाही वाटत_ अमित ठाकरे संतापले
Maval Visapur Patan Landslide : आनंद देणाऱ्या निसर्गाचा प्रकोप; मावळच्या 'पाटण'वर काळाची झडप
Anandache Paan : तीस लेखिका तीस संघर्ष, अनवट पुस्तकावर गप्पा, पाहा आनंदाचे पान
Jawhar Waterfall | 'मिनी महाबळेश्वर'चं मनमोहक रूप; धबधबे, धुकं अन् काचेचा व्ह्यूइंग ब्रिज - ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India : फक्त संजू सॅमसन नव्हे आणखी तीन बड्या खेळाडूंना टी 20  संघातून डच्चू, निवड समितीकडून मोठा दणका
फक्त संजू सॅमसन नव्हे आणखी तीन बड्या खेळाडूंना टी 20  संघातून डच्चू, निवड समितीकडून मोठा दणका
महाडच्या कुर्ले घाटात दरड कोसळली, झाडासह मातीचा मोठा ढिगारा रस्त्यावर, महाड - विन्हेरे मार्गावरील वाहतूक बंद  
महाडच्या कुर्ले घाटात दरड कोसळली, झाडासह मातीचा मोठा ढिगारा रस्त्यावर, महाड - विन्हेरे मार्गावरील वाहतूक बंद  
मुंबई 'लोकल'चा खोळंबा, वसईत अडकले हजारो चाकरमानी; अतिवृष्टीमुळे अकडलेल्या 15 जणांची थरारक सुटका
मुंबई 'लोकल'चा खोळंबा, वसईत अडकले हजारो चाकरमानी; अतिवृष्टीमुळे अकडलेल्या 15 जणांची थरारक सुटका
मुंबईत 3 दिवसांत 300 मिमि पाऊस, वाऱ्याचा वेग 70 किमी; महापालिकेत विशेष महासभा बोलावली, वादळी 'चर्चा' होणार
मुंबईत 3 दिवसांत 300 मिमि पाऊस, वाऱ्याचा वेग 70 किमी; महापालिकेत विशेष महासभा बोलावली, वादळी 'चर्चा' होणार
Rain Alert : राज्यात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज, पालघर ते रत्नागिरी, नाशिक ते सातारा, कमी काळात जास्त पावसाची शक्यता: मयुरेश प्रभुणे
पालघर ते रत्नागिरी, नाशिक ते सातारा, कमी काळात जास्त पावसाची शक्यता, मयुरेश प्रभुणे यांच्याकडून सतर्कतेचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 जुलै 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 जुलै 2026 | सोमवार
Sanju Samson : वैभव सूर्यवंशीची एंट्री होताच संजू सॅमसनला घरचा रस्ता, झिम्बाब्वेविरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, श्रेयस अय्यरचा लाडका विकेटकीपर संघात दाखल
संजू सॅमसनला घरचा रस्ता, झिम्बाब्वेविरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, श्रेयस अय्यरचा लाडका विकेटकीपर संघात दाखल
ह्रदयद्रावक... भिवंडीत पावसाच्या पाण्यामुळे नाल्यात वाहून गेला चिमुकला; अहिल्यानगरमध्ये करंट लागून चिमुकली ठार
ह्रदयद्रावक... भिवंडीत पावसाच्या पाण्यामुळे नाल्यात वाहून गेला चिमुकला; अहिल्यानगरमध्ये करंट लागून चिमुकली ठार
Embed widget