Amitabh Bachchan Childhood Actor :  बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी सिने कारकिर्दीत अनेक संस्मरणीय चित्रपट दिले. त्यांच्या चित्रपटात अमिताभ यांच्या बालपणीची भूमिका वेगवेगळ्या बालकलाकारांनी साकारली. 'कुली' या गाजलेल्या चित्रपटातही अमिताभ यांच्या बालपणातील भूमिका साकारणाऱ्या  बालकलाकाराचे कौतुक झाले होते. हा बालकलाकार मास्टर रवी म्हणून प्रसिद्ध झाला. मात्र,  त्यानंतर त्याची ओळख रवी वलेचा अशी निर्माण झाली. मास्टर रवीने अनेक सुपरहिट चित्रपटात काम केले आहे. सध्या हा मास्टर रवी करतो काय? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. 


या चित्रपटात मास्टर रवीने केलंय काम?


मास्टर रवीने 1977 मध्ये सुपरहिट चित्रपट अमर अकबर अँथोनी या चित्रपटातही अमिताभ यांच्या बालपणीची भूमिका साकारली होती. विविध भाषेतील जवळपास 300 चित्रपटांमध्ये काम करणारे रवी सध्या 46 वर्षांचे आहेत. कुली, अमर अकबर अँथोनी, देश प्रेमी, शक्ती, मिस्टर नटवरलाल यासह गाजलेल्या अनेक चित्रपटात काम केले. रवीने 90 च्या दशकातील शांती या चित्रपटात काम केले आहे. 




सध्या रवी काय करतात?


रवी सध्या हॉस्पिटिलीटी इंडस्ट्रीतील नावाजलेले नाव आहे.  सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रवी हे मुलांना व्यक्तीमत्व विकास आणि अन्य कौशल्याचे प्रशिक्षण देतात. ग्लॅमरस सिनेइंडस्ट्रीपासून दूर राहून सध्या स्वत:चा व्यवसाय करत आहेत. रवी हे भारतातील आघाडीच्या खासगी बँकांना आपली सेवा प्रदान करत आहेत. मागील दोन दशकांपासून रवी या क्षेत्रात आपला दबदबा ठेवून आहेत. अहमदाबाद येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमधून त्यांनी हॉस्पिटिलीटी आणि फॅसिलिटीजमध्ये एमबीएची पदवी घेतली. त्यानंतर रवी या क्षेत्रात उतरले. सध्या आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून ते कोट्यवधी कमवत आहेत. 


इतकंच नाही ज्या तरुणांना या हॉस्पिटिलीटी क्षेत्राचा हिस्सा व्हायचा आहे. त्यांनी रवी हे मार्गदर्शनही करतात.