Bollywood Actress : बॉलिवूडच्या (Bollywood) ग्लॅमरस जगतात प्रवेश करण्यासाठी अनेकजण धडपड करत असतात. यात काहींना यश मिळते आणि सिनेइंडस्ट्रीत स्थिरस्थावर होतात. तर, काहीजणांचा संघर्ष कायम सुरू असतो. काहींची रुपेरी पडद्यावरील एन्ट्री स्वप्नवत होते.तर, काहीजण चंदेरी जगातून कधी माघार घेतात हे कळत नाही. आपल्या पदार्पणातील चित्रपटातून सगळ्यांचे लक्ष वेधणाऱ्या अभिनेत्रीच्या सिने करिअरला तिसऱ्या चित्रपटानंतर पूर्ण विराम लागला.
पहिल्याच चित्रपटात दमदार कामगिरी
बॉलीवूडच्या इतिहासात सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये 'दंगल'या चित्रपटाचे नाव त्या यादीत असेल. आमिर खानची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट 2016 मध्ये प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर 2 हजार कोटींची कमाई करण्यात यशस्वी ठरला होता. 8 वर्षांनंतरही या चित्रपटाचा एकही विक्रम इतर चित्रपटांना मोडता आलेला नाही. या चित्रपटाची अभिनेत्री झायरा वसीम (Zaira Wasim) ही रातोरात स्टार झाली. या चित्रपटात झायरा वसीमने गीता फोगटची बालपणीची भूमिका साकारली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. यानंतर जायरा वसीमही रातोरात स्टार झाली. प्रेक्षकांसह, समीक्षकांनीदेखील त्यावेळच्या 16 वर्षाच्या झायराच्या भूमिकेचे कौतुक केले होते.
दुसऱ्या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर कमाल
त्यानंतर झायराने आपल्या दुसऱ्या चित्रपटात कमालच केली. अभिनेत्री झायरा वसीमची महत्त्वाची भूमिका असणाऱ्या सीक्रेट सुपरस्टारने कमालच केली. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. झायरा वसीमच्या भूमिकेचे कौतुक झाले होते. या चित्रपटात झायरा वसीमने आमिर खानसोबत स्क्रीन शेअर केली होती. 'सीक्रेट सुपरस्टार' या चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर 912 कोटींची कमाई करून इतिहास रचला. एकामागून एक हिट चित्रपट दिल्यानंतर झायरा वसीमकडे चित्रपटांच्या ऑफर्सची रांग लागली होती.
तिसऱ्या चित्रपटानंतर बॉलिवूडला अलविदा...
झायरा वसीमचा 'द स्काय इज पिंक' (The Sky Is Pink) हा तिसरा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करू शकला. चित्रपटातील चांगली स्टारकास्ट, विषय असून हा चित्रपट तिकिटबारीवर अपयशी ठरला.
आपला तिसरा चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर झायरा वसीमने बॉलिवूडच्या ग्लॅमरस जगापासून स्वत:ला दूर ठेवण्यास सुरुवात केली. लहानवयात चंदेरी दुनियेत मिळालेले वलय दूर सारून झायराने मुंबईचा निरोप घेतला आणि काश्मीरमध्ये परतली. 2019 नंतर झायराने कोणताही चित्रपट केला नाही. तिने एक पोस्ट करत आपण या सिनेइंडस्ट्रीत आनंदाने काम करू शकत नसल्याचे सांगत बॉलिवूडपासून दोन हात दूर राहण्याचा निर्णय जाहीर केला. तिच्या या निर्णयाचा चाहत्यांना धक्का बसला. झायरा सोशल मीडियावर सक्रिय असून ती आपले विचार व्यक्त करत असते.