Ranbir Kapoor : बॉलीवूडचा सुपरस्टार रणबीर कपूर (Animal star Ranbir Kapoor Rejected movies list) लवकरच त्याच्या आगामी 'अॅनिमल' चित्रपटातून थिएटरमध्ये धुमाकूळ घालण्याच्या तयारीत आहे. सुपरस्टार रणबीर कपूरचा हा चित्रपट लवकरच थिएटरमध्ये दाखल होणार आहे. सिनेस्टार रणबीर कपूरच्या या सिनेमाची चाहत्यांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. रणबीर कपूरने आपल्या फिल्मी करिअरमध्ये अनेक उत्तम चित्रपट केले आहेत. मात्र, त्याने नकार देऊन सुद्धा पायावर धोंडा पाडून घेतला आहे. 


जाणून घेऊया, सुपरस्टार रणबीर कपूरच्या या 10 नाकारलेल्या चित्रपटांबद्दल


दिल्ली बेली (Delhi Belly)


आमिर खान प्रॉडक्शनच्या बॅनरखाली बनलेला इम्रान खानचा हा सिनेमा त्याच्या कारकिर्दीतील उत्कृष्ट सिनेमांच्या यादीत येतो.  इम्रान खानच्या आधी रणबीर कपूरला या चित्रपटाची ऑफर मिळाली होती, पण काही कारणांमुळे रणबीर कपूरने हा चित्रपट नाकारला.


जिंदगी न मिलेगी दोबारा (Zindagi Na Milegi Dobara)


मीडिया रिपोर्ट्सनुसार दिग्दर्शक झोया अख्तरने यापूर्वी चित्रपट स्टार हृतिक रोशनच्या ब्लॉकबस्टर चित्रपट जिंदगी ना मिलेगी दोबारासाठी रणबीर कपूरशी संपर्क साधला होता. रणबीर कपूरने हा सिनेमा नाकारला आणि हृतिक रोशनला त्याच्या करिअरमध्ये आणखी एक मोठा हिट सिनेमा मिळाला.


बँड बाजा बारात (Band Baaja Baaraat)


अनेकांना माहित नसेल पण रणवीर सिंगच्या आधी रणबीर कपूरला अनुष्का शर्मा स्टारर चित्रपट बँड बाजा बारातची ऑफर मिळाली होती. अभिनेत्याने हा चित्रपटही आपल्या हातून जाऊ दिला होता.


दिल धडकने दो (Dil Dhadakne Do)


झोया अख्तरने रणबीर कपूर आणि त्याची चुलत बहीण करीना कपूर खानला तिच्या आगामी 'दिल धडकने दो' चित्रपटासाठी संपर्क साधला होता. झोया अख्तरला पडद्यावर भाऊ आणि बहिणीच्या भूमिकेसाठी दोघांनाही कास्ट करायचे होते. मात्र रणबीर कपूरने या चित्रपटाची ऑफर नाकारली. यानंतर करिनानेही या चित्रपटातून माघार घेतली.


गल्ली बॉय (Gully Boy)


झोया अख्तर पुन्हा एकदा रणबीर कपूरमुळे निराश झाली. 'गली बॉय' या चित्रपटासाठीही त्याला अप्रोच करण्यात आले होते. पण रणबीर कपूरने सहाय्यक कलाकाराच्या भूमिकेमुळे हा चित्रपट नाकारला. त्यानंतर सिद्धांत चतुर्वेदीने चित्रपटात प्रवेश केला.


2 स्टेट्स (2 States)


या चित्रपटासाठीही रणबीर कपूर निर्मात्यांची पहिली पसंती होती. मात्र, नंतर अर्जुन कपूरने या चित्रपटात प्रवेश केला.


दिलवाले (Dilwale)


शाहरुख खान आणि काजोल अभिनीत दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या चित्रपटासाठी रणबीर कपूरलाही संपर्क करण्यात आला होता. पण रणबीर कपूरनेही हा चित्रपट नाकारला होता. त्यानंतर वरुण धवनने या चित्रपटात प्रवेश केला.


गोलियों की रासलीला राम-लीला (Goliyon Ki Rasleela Ram-Leela)


सावरियानंतर पुन्हा एकदा दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांना रणबीर कपूरसोबत गोलियों की रासलीला - राम लीला करायचा होता. मात्र रणबीर कपूरने या चित्रपटापासून दुरावला आणि त्यानंतर रणवीर सिंहने या चित्रपटात प्रवेश केला.


'बँग-बँग' (Bang Bang)


दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदने पहिल्यांदा रणबीर कपूरला 'बँग-बँग' चित्रपटासाठी संपर्क साधला होता. पण अभिनेत्याने ही ऑफर नाकारली. त्यानंतर हृतिक रोशनने चित्रपटात प्रवेश केला.


बेफिक्रे (Befikre)


दिग्दर्शक आदित्य चोप्राला या चित्रपटात अभिनेता रणबीर कपूरला कास्ट करायचे होते. मात्र, हा चित्रपट नाकारला. त्यानंतर रणवीर सिंहने या चित्रपटात प्रवेश केला.


इतर महत्वाच्या बातम्या