Happy Birthday Amitabh Bachchan : सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचा आज 11 ऑक्टोबर रोजी वाढदिवस आहे. 82 व्या वर्षीही बिग बी इंडस्ट्रीमध्ये तितकेच सक्रीय आहेत. अमिताभ बच्चन यांनी दमदार अभिनयाच्या जोरावर चाहत्यांच्या मनात खास स्थान निर्माण केलं आहे. महानायक बनण्याचा त्यांचा हा प्रवास सोपा नव्हता. स्वप्नांसह कोलकाताहून मुंबईला आलेल्या बिग बींनी खूप संघर्ष केला. प्रसिद्ध लेखल हरिवंशराय बच्चन यांचा मुलगा असूनही त्यांच्यासाठी शिखरावर पोहोचण्यापर्यंतचा प्रवास खडतर होता.
महानायक अमिताभ बच्चन यांचा 81 वा वाढदिवस
1969 मध्ये 'सात हिंदुस्तानी' या चित्रपटात अमिताभ बच्चन यांना महत्त्वाची भूमिका मिळाली. पण बिग बींचे सुरुवातीचे अनेक चित्रपट एकापाठोपाठ एक फ्लॉप झाले असले. यानंतरही त्यांनी हार मानली नाही. अखेर 'दीवार' चित्रपटातून त्यांनी हे सिद्ध केलं की ते इंडस्ट्रीमध्ये महानायक होण्यासाठी आले आहेत.
मरीन ड्राइव्हच्या बाकड्यावर काढल्या काही रात्री
1960 मध्ये अभिनेता होण्याचे स्वप्न घेऊन अमिताभ बच्चन मुंबईत आले. या कठीण काळात बिग बींना राहायला जागा नव्हती. त्यांनी मरीन ड्राईव्हच्या बाकड्यावर रात्र घालवली आणि त्यावेळी त्यांना उंदरांची साथ होती. एका मुलाखतीत अमिताभ यांनी सांगितलं होतं की, माझ्याकडे राहायला जागा नव्हती. त्यामुळे मुंबईत आल्यानंतर मी मरीन ड्राइव्हच्या बाकड्यावर काही रात्री काढल्या. तिथे खूप उंदीर होते. इतके मोठे उंदीर मी आयुष्यात पहिल्यांदाच पाहिले होते.
अमिताभ बच्चन यांची संपत्ती किती?
मुंबईत आल्यावर सुरुवातीच्या काळात पैसे नसलेल्या अमिताभ बच्चन यांची आज कोट्यवधींची संपत्ती आहे. केबीसीच्या एका एपिसोडमध्ये त्यांनी सांगितलं होतं की, ते मुंबईतील एका खोलीत आठ लोकांसह राहत होते आणि दरमहा 400 रुपये कमावत होता. 2024 च्या हुरुन इंडिया रिच लिस्टनुसार, अमिताभ बच्चन यांची एकूण संपत्ती 1,600 कोटी रुपये आहे. बिग बी बॉलिवूडमधील चौथ्या क्रमांकाचा श्रीमंत सेलिब्रिटी आहे.
बिग बी दोन वाढदिवस का साजरे करतात?
11 ऑक्टोबर ऐवजी अमिताभ बच्चन 2 ऑगस्ट रोजी दुसरा वाढदिवस साजरा करतात. कुली चित्रपटाच्या शुटींगदरम्यान, अमिताभ बच्चन जखमी झाले होतं. बंगळुरुमध्ये सेटवर त्यांना गंभीर दुखापत झाली होती. यावेळी हजारो फॅन्स रुग्णालयाबाहेर त्यांच्यासाठी प्रार्थना करत होते. त्यानंतर 2 ऑगस्ट 1982 रोजी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. याच कारणामुळे अमिताभ बच्चन 2 ऑगस्ट रोजी दुसरा वाढदिवस साजरा करतात.
महत्त्वाच्या इतर बातम्या :