Arshad Nadeem : पॅरिस ऑल्मपिकमध्ये गौरवास्पद कामगिरी केलेल्या नीरज चोप्राचं पुन्हा एकदा देशभरात भरुभरुन कौतुक झालं. अवघ्या काही मीटरसाठी नीरजचं (Neeraj Chopra) सुवर्णपदक हुकलं. पाकिस्तानचा भालाफेकपटू अर्शद नदीमनं (Arshad Nadeem) हे सुवर्णपदक आपल्या नावावर करत तब्बल 32 वर्षांचा पाकिस्तानचा पदकांचा दुष्काळ संपवला. त्यामुळे त्याच्यावर जर बायोपीक झाला तर त्यामध्ये कुणाला पाहायला आवडेल? या प्रश्नावर नीरज चोप्राच्या उत्तराने साऱ्यांचचं लक्ष वेधून घेतलं आहे.
भारत आणि पाकिस्तान या दोन्ही सिनेमांचा मोठा चाहता वर्ग आहे. पूर्वी भारताचाच भाग असलेल्या आजच्या पाकिस्तानात आजही बॉलीवूड सिनेतारकांचे आणि सिनेमांचे चाहते आहेत. त्यामुळे जर या दोन्ही खेळाडूंच्या आयुष्यावर भारतात जर बायोपीक झाला तर त्यामध्ये कोणत्या कलाकराने ती भूमिका साकारायला हवी याविषयी दोघांनीही भाष्य केलं आहे.
'या' अभिनेत्याने साकारावी अर्शदची भूमिका - नीरज
ऑलम्पिकमध्ये पदक मिळाल्यानंतर नीरज आणि अर्शदने माध्यमांना प्रतिक्रिया दिली. त्यामध्ये नीरजला विचारण्यात आलं की, भारत आणि पाकिस्तानमध्ये हिंदी सिनेमांचे चाहते खूप आहेत. त्यामुळे जर अर्शद नदीमवर सिनेमा झाला तर त्यामध्ये अर्शदची भूमिका कुणी साकारायला हवी असं तुला वाटतं? त्यावर नीरजने उत्तर दिलं की, 'माहित नाही, पण कुणीतरी चांगली उंची असणाऱ्या अभिनेत्यानेच ती भूमिका साकारायला हवी. कारण अर्शदची उंची चांगली आहे. आपल्या भारतात अमिताभ बच्चन यांनी तरुणपणात जर त्याची भूमिका साकारली असती, तर ती खूप छान झाली असती.'
जसा नीरजला हा प्रश्न विचारण्यात आला त्याचप्रमाणे अर्शदला देखील हा प्रश्न विचारण्यात आला. नीजर चोप्रावर जर सिनेमा करण्यात आला, त्यामध्ये कुणी त्याची भूमिका साकारावी? त्यावर अर्शदने म्हटलं की, 'नीरजची भूमिका शाहरुखने करावी.' त्यामुळे आता या दोन्ही खेळाडूंच्या आयुष्यावर सिनेमा येणार का? आणि तो आला तरी भारतात तयार होणार की पाकिस्तानमध्ये हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल.