एक्स्प्लोर
बिग बी-ऋषी कपूरच्या '102 नॉट आऊट'चा टीझर रिलीज
अमिताभ आणि ऋषी कपूर यांची जोडी तब्बल 27 वर्षांनी मोठ्या पडद्यावर एकत्र येत आहे.
मुंबई : बॉलिवूडचा महानायक अभिताभ बच्चन यांचे चित्रपट म्हणजे चाहत्यांसाठी पर्वण असते. बिग बींच्या जोडीला आता सत्तरच्या दशकातील चॉकलेट बॉय आला आहे. अमिताभ आणि ऋषी कपूर यांची जोडी तब्बल 27 वर्षांनी मोठ्या पडद्यावर एकत्र येत आहे. '102 नॉट आऊट' या चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला आहे.
ऋषी कपूर आणि अमिताभ बच्चन वयोवृ्द्धांच्या भूमिकेत आहेत. विशेष म्हणजे बिग बी हे चिंटू म्हणजेच ऋषी कपूर यांच्या वडिलांच्या भूमिकेत आहेत. अमिताभ बच्चन दर चित्रपटात वेगळा लूक करतात, त्याचप्रमाणे या सिनेमातही ते अनोख्या अंदाजात पाहायला मिळणार आहेत. ऋषी कपूर यापूर्वीही 'कपूर अँड सन्स' चित्रपटात वृद्धाच्या भूमिकेत दिसलो होते.
'ओह माय गॉड'चे दिग्दर्शक उमेश शुक्ला यांनीच '102 नॉट आऊट' सिनेमाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी उचलली आहे. सौम्या जोशी यांनी चित्रपटाची कथा-पटकथा लिहिली आहे. 4 मे 2018 रोजी सिनेमा प्रदर्शित होणार आहे.
1991 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'अजूबा' चित्रपटात अमिताभ आणि ऋषी यांची मुख्य भूमिका होती. त्यानंतर 27 वर्षांनी दोघांना एकत्र झळकताना पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
पाहा व्हिडिओ :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement