Amitabh Bachchan : मनमोहन देसाई (Manmohan Desai) यांच्या अमर, अकबर, अँथोनी (Amar Akbar Anthony Movie) या चित्रपटाने तिकिटबारीवर चांगली कामगिरी केली होती. आजही या चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळतो. या चित्रपटात 'माय नेम इज अँथोनी गोन्साल्विस' असे एक धमाल गाणं आहे. या चित्रपटात अमिताभ यांच्या व्यक्तीरेखेचे नाव अँथोनी असल्याने त्या गाण्यात अँथोनी गोन्साल्विस हा शब्द वापरला असावा असे अनेकांना वाटते. मात्र, प्रत्यक्षात हे नाव वापरण्यामागे एक खास कारण आहे.
संगीतकार लक्ष्मीकांत-प्यारेलाल या जोडीतील प्यारेलाल यांच्या आग्रहावरून अँथोनी गोन्साल्विस हे नाव या गाण्यात समाविष्ट करण्यात आले. अँथोनी गोन्साल्विस (Anthony Gonsalves) हे नाव संगीतसृष्टीशी संबंधित आहे.
'अमर अकबर अँथनी' चित्रपटातील या गीतांना संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी स्वरबद्ध केले आहे. या संगीतकार जोडीने बॉलिवूडवर अधिराज्य गाजवले. आजही त्यांनी संगीतबद्ध केलेली गाणी चांगलीच लोकप्रिय आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन यांचे नाव अँथनी होते. एक गाणे देखील अशाच पद्धतीने चित्रित केले जाणार होते. मात्र, या गाण्यातील अँथनी गोन्साल्विस हे नाव कोणत्याही काल्पनिक पात्राचे नाव नाही. या नावाची व्यक्ती प्रत्यक्षात होती. हे नाव संगीतविश्वाशी संबंधित आहे.
कोण होते अँथोनी गोन्साल्विस?
संगीतकार प्यारेलाल यांनी अँथनी गोन्साल्विस यांच्याकडून व्हायोलिनचे धडे घेतले. फिल्म हिस्ट्री पिक्स या इन्स्टाग्राम अकाउंटनुसार, प्यारेलाल यांनी हे गाणे तयार केले होते आणि ते त्यांच्या गुरूंना श्रद्धांजली म्हणून समर्पित केले होते.
अँथनी गोन्साल्विस हे गोव्यातील माजोर्डा गावचे रहिवासी होते. जे व्यवसायाने संगीतकार होते. 1950 ते 1960 दरम्यान प्रदर्शित झालेल्या अनेक हिंदी चित्रपटांमध्ये ते संगीतकार म्हणून जोडले गेले आणि त्यांनी संस्मरणीय संगीतही दिले. ते स्वतः एक उत्कृष्ट व्हायोलिन वादक होते. 1943 मध्ये संगीतकार नौशाद यांच्या टीममध्ये सामील होऊन त्यांची कारकीर्द सुरू झाली होती.
पाहा व्हिडीओ : My Name Is Anthony Gonsalves Full Video - Amar Akbar Anthony | Amitabh Bachchan | Kishore Kumar