Actor Gave Hit After 13 Years :  तुषार कपूर (Tushar Kapoor), ईशा देओल (Esha Deol), उदय चोप्रा (Uday Chopra) असे अनेक स्टारकिड्स आहेत ज्यांना बॉलिवूडमध्ये आपली स्वत:ची ओळख निर्माण करण्यास अपयश आले. या यादीत आणखी एका स्टारकिडचाही समावेश झाला आहे. या स्टारकिडची बहीण, वडील आणि आई हे सर्व उत्कृष्ट कलाकार आहेत. त्यांनी बॉलिवूडमध्ये आपले स्वत:चे स्थान निर्माण केले आहे. या अभिनेत्याने बॉलिवूडमध्ये स्वत:चे स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पण, त्याचा पहिलाच चित्रपट फ्लॉप झाला.  या अभिनेत्याला हिट चित्रपटाचे यश पाहण्यासाठी तब्बल 13 वर्ष प्रतीक्षा करावी लागली. 


आपण ज्या अभिनेत्याबद्दल बोलत आहोत तो म्हणजे शत्रुघ्न सिन्हा (Shatrughan Sinha) आणि पूनम सिन्हा (Poonam Sinha) यांचा मुलगा लव सिन्हा (Luv Sinha) . बहीण सोनाक्षीप्रमाणे लवनेही इंडस्ट्रीत आपले स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता पण तसे होऊ शकले नाही. त्याने 2010 मध्ये 'सादियान' चित्रपटातून पदार्पण केले. या चित्रपटात त्यांच्यासोबत हेमा मालिनी, ऋषी कपूर, रेखा आणि जावेद शेख दिसले होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरेल, अशी अपेक्षा होती, पण तो सपशेल फ्लॉप झाला.


पहिल्या चित्रपटानंतर 8 वर्षांचा घेतला ब्रेक


पहिला चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर लवने आठ वर्षांचा मोठा ब्रेक घेतला. त्यानंतर तो 2018 मध्ये आलेल्या 'पलटन' या चित्रपटात तो झळकला होता. जेपी दत्ता यांचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटात लवसोबत जॅकी श्रॉफ, अर्जुन रामपाल, सोनू सूद, हर्षवर्धन राणे, सोनल चौहान यांच्यासह अनेक मोठे कलाकार दिसले होते. पण हा चित्रपटही बॉक्स ऑफिसवर फारशी चमक दाखवू शकला नाही. 







13 वर्षानंतर नशिबी आला हिट चित्रपट...






दोन फ्लॉप चित्रपट आपल्या नावावर जमा झाल्यानंतर सनी देओलने लवचे सिनेकारकीर्द वाचवली. 2023  मध्ये प्रदर्शित झालेल्या 'गदर 2' या चित्रपटात लवने भूमिका साकारली होती. 'गदर 2' हा 2023 मधील सर्वात मोठा ब्लॉकबस्टर चित्रपट आहे. भारतातच या चित्रपटाने 525 कोटी रुपयांचा व्यवसाय केला. या चित्रपटात लवने फरीद ही व्यक्तीरेखा साकारली होती.